आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या भाषणात अल्पसंख्याकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींनी पीएम नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राहुल म्हणाले, की "पंतप्रधान देशाला तोडणारा नव्हे, तर जोडणारा असायला हवा. आरएसएस नागपूरहून देश चालवण्याच्या प्रयत्न करत आहे." एवढेच नव्हे, तर राहुल गांधींनी मोदींना समोरासमोर येऊन वादसभेचे आव्हान दिले. "मोदीजींसोबत माझी वादसभा होऊ द्या, ते पळून जातील, ते भित्रे आहेत." असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
भाजप, मोदींना पराभूत करणार...
राहुल गांधी पुढे म्हणाले, "आपण नरेंद्र मोदींचा चेहरा लक्षपूर्वक पाहाल तर आपल्याला दिसेल की त्यांच्या चेहऱ्यावर घबराट आहे. मोदींना कळून चुकले की देशाची वाटणी करून, घृणा पसरवून हिन्दुस्थानावर राज्य केले जाऊ शकत नाही. हिन्दुस्थानच्या पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचे काम करावे. ते असे करत नसतील तर त्यांना पदावरून हटवायला हवे. पाच वर्षांपूर्वी म्हटले जात होते, की नरेंद्र मोदींची छाती 56 इंची आहे, ते 15 वर्षे राज्य करतील. आज काँग्रेस पार्टीने नरेंद्र मोदींच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या आहेत. शेतकरी असो वा मजदूर किंवा गरीबांच्या समस्या आणि भ्रष्टाचार आपल्याला दिसेल की मोदींचे सत्य देशाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले आहे. 2019 मध्ये काँग्रेस आता मोदी आणि भाजपसह आरएसएसला पराभूत करणार आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.