आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान भ्रष्टच, ते अनिल अंबानींचे चौकीदार : राहुल; माध्यमांतील नव्या वृत्तामुळे सरकार अडचणीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंच मीडिया: रिलायन्स कंपनीला ठेवण्याच्या अटीवरच करार झाला
डॅसोचे स्पष्टीकरण: रिलायन्सला कोणत्याही दबावाविना निवडले
आरोप : अंबानींच्या खिशात मोदींनी टाकले ३० हजार कोटी रुपये


नवी दिल्ली- रफाल करारावर मीडियापार्ट या फ्रेंच वेबसाइटच्या नव्या दाव्यानंतर भारतात पुन्हा राजकारण तापले आहे. रफाल तयार करणारी कंपनी डॅसो एव्हिएशनचे डेप्युटी सीईअो लॉइक सेगालेन यांच्या वर्षभरापूर्वीच्या वक्तव्याच्या आधारे मीडियापार्टने दावा केला की, अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहासोबत भागीदारीच्या अटीवरच ३६ विमानांचा करार झाला होता. मात्र, डॅसोने हा दावा फेटाळत म्हटले, ऑफसेट पार्टनरशिपसाठी डॅसोने कोणत्याही दबावाविना रिलायन्सची निवड केली आहे.


दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मीडियापार्टच्या दाव्यांच्या आधारावर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. ते म्हणाले,  ‘पंतप्रधानाने अनिल अंबानींच्या खिशात ३० हजार काेटी रुपये टाकले आहेत. पंतप्रधान म्हणतात की ते फक्त चौकीदार आहेत. आता जगाला कळले आहे की ते भारत नव्हे, अंबानींचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान देशाची नव्हे, अनिल अंबानींची चौकीदारी करत आहेत.’


संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यावरही सवाल- फ्रान्सला जाण्याची घाई काय?
राहुल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘संरक्षणमंत्री बुधवारी रात्री फ्रान्सला गेल्या. त्यापेक्षा स्पष्ट संकेत काय असू शकतो? फ्रान्सला जाण्याची इतकी काय घाई होती? त्या डॅसोच्या कारखान्यालाही भेट देतील. डॅसोला मोठे कंत्राट मिळाले आहे. ते भारत सरकारच्या इच्छेनुसारच स्पष्टीकरण देत आहेत’.


कंत्राटासाठी अटी मान्य करणे बंधनकारक होते : डॅसो अधिकारी
मीडियापार्टच्या दाव्यानुसार, त्यांनी डॅसोची अंतर्गत कागदपत्रे मिळवली आहेत. त्यानुसार ११ मे २०१७ ला जॉइंट व्हेंचर डॅसो-रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडच्या (डीआरएएल) एक प्रेझेंटेशनमध्ये डॅसोच्या डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने म्हटले होते, ‘कंत्राट मिळवण्यासाठी अटी मान्य करणे अनिवार्य आणि बंधनकारक होते.’


डॅसो म्हणाली : २ सरकारांत करार झाला, काेणताही दबाव नव्हता
डॅसो एव्हिएशनने म्हटले आहे की, ‘हा करार भारत आणि फ्रान्स सरकारदरम्यान झाला आहे. डॅसोने िरलायन्सला कोणत्याही दबावाविना निवडले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत अनेक कंपन्यांशी करार झालेत. या शिवाय बीटीएसएल, डीईएफएसवायएस, कायनेटिक, महिंद्रा, मियानी, सॅमटेल आदी कंपन्यांशीही इतर करार झाले आहेत.’


कशामुळे रफाल करारावर वाद?
२ इंजिन असलेले फ्रेंच मल्टिरोल युद्ध विमान. जगातील सर्वाेत्तम युद्ध जेट विमानांत रफालचा समावेश होतो.
यूपीएचा करार असा: १२६ रफालपैकी १८ फ्रान्समध्ये बनणार होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स १०८ विमानांची निर्मिती करणार होती. एक विमान ५२६ कोटींचे होते.
एनडीएने करारात हे बदल केले: १२६ एेवजी ३६ रफाल घेण्याचा निर्णय झाला. एका विमानाची किंमत सुमारे १६३८ काेटी ठरवली. देशात बनणाऱ्या विमानांचे काम रिलायन्स डिफेन्स कंपनीकडे सोपवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...