आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटण्यासाठी राहुल आणि सोनिया गांधींकडून वेळ ने देण्याच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, ते पक्षातील एकमेव व्यक्ती होते, जे कधीही माझ्या घरात येऊ शकत होते. यापूर्वी सिंधिया यांच्या राजीनामाच्या 24 तासानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रीया आली आहे. त्यांनी ट्विटरवरुन भाजप सरकारवर निशाना साधला आहे. ते म्हणाले की, ''मोदी सरकार जनतेने निवडलेल्या काँग्रेस सरकारला अस्थिर करण्यात व्यस्त आहे, तेव्हा ते हे पाहण्यात चुकले की, तेलाच्या किमतीत 35% घट झाली आहे. तुम्ही देशातील पेट्रोलच्या किमती 60 रुपये प्रतिलीटर करू शकता का? यामुळे देशाच्या अर्थव्यवस्तेला गती मिळेल."
‘काँग्रेसने अनेक महत्वाची पदे दिली, तरीदेखील मोदी-शाह यांना शरणात गेले’
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यावर मध्य प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर निशाना साधला. म्हणाले की, 'पक्षाने त्यांना खासदार, मंत्री आणि राष्ट्रीय महासचिवसारखे महत्वाची पदे दिली, तरीदेखील ते मोदी-शाह यांना शरण गेले.' सिंधियांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशमधील 22 आमदारांनी राजीनामे दिले. त्यानंतर सिंधिया यांनी आज भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
1957 पर्यंत सिंधिया कुटुंब हिंदू महासभेसोबत होते- दिग्विजय
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बुधवारी सिंधिया यांच्याबद्दल एख ट्वीट केले. त्यांनी लिहीले, 'त्यांचा (सिंधिया कुटुंब) 1957 पर्यंत हिंदू महासभेशी संबंध होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरूंनी दिवंगत राजमाता विजयाराजे सिंधिया यांना काँग्रेसमध्ये घेतले. त्यानंतर 1957 आणि 1962 मध्ये त्यांना खासदार बनवले. त्यांनी 1967 मध्ये काँग्रेसची साथ सोडली.'
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले, 'महात्मा गांधींना मारण्यासाठी नाथूराम गोडसेने ज्या रिवाल्वरचा वापर केला होता, त्याला ग्वालियरच्या परचुरेने दिली होती.' दिग्विजय यांनी ट्वीटमध्ये ज्या परचुरेचे नाव घेतले आहे, त्यांचे संपूर्ण नाव डॉ. डीएस परचुरे होते, ते ग्वालियरमध्ये एका हिंदू संघटनेचे प्रमुख होते.
त्यांना भाजपमध्ये काँग्रेससारखा मान मिळणार नाही- सलमान खुर्शीद
काँग्रेसचे जेष्ठ नेत सलमान खुर्शीद म्हणाले की, ‘‘पक्षाकडून इतका मान मिळाल्यानंतर त्यांनी थोडी वाट पाहायला हवी होती. पक्ष संकटात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, बुडत्या जहाजातून लोक पळून जातात. वेळ चांगली नसल्यास मित्रही साथ सोडतो. चांगली वेळ आल्यावर सगळे परत येतील. मला माहितीये, आमच्या पक्षात त्यांना जो मान मिळाला, तो भाजपमध्ये मिळणार नाही.’’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.