आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक बाजुला ठेऊन राहुल गांधी बँकॉकला गेलेत, भाजप नेत्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यावरुन नेहमी भाजपच्या निशाण्यावर असतात. आता परत एकदा त्यांची बँकॉकला गेल्याची बातमी समोर आली आहे. हरियाणा हाउसिंग बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते जवाहर यादव यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला रवाना झाले आहेत.

दुसरीकडे, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट केले- "तुम्ही विचार करत असाल, बँकॉक का इतक ट्रेंड करत आहे"

दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदर सिंग बग्गा यांनी ट्वीट केले- "बँकॉक आता भारतात ट्रेंड करत आहे"

राहुल यांच्या बँकॉक दौऱ्याचे नेमके कारण समोर आले नाहीये
दरम्यान, राहुल गांधींच्या बँकॉक दौऱ्याचे नेमके कारण समोर आले नाहीये. पक्षानेही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये. हरियाणाच्या 90 जागांसाठी आणि महाराष्ट्रातील 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. दोन्ही राज्यातील निकाल 24 तारखेला लागेल.

बातम्या आणखी आहेत...