आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेता ठरवण्याचा अधिकार राहुल गांधींकडेच; एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाहीच : मल्लिकार्जुन खरगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘एक्झिट पोलच्या अंदाजावर आमचा विश्वास नाही, देशात अनुकूल सरकार येईल,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी दिली. तसेच ‘राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जागी विधानसभेचे नवे विराेधी पक्षनेते निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकमताने घेतला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.


विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवा नेता निवडण्यासाठी सोमवारी विधानभवनात काँग्रेस विधिमंडळ आमदांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात खरगे यांनी सर्व आमदारांशी व्यक्तिगत चर्चा करून काही नावांवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय एकमताने काँग्रेस आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी तसा ठराव मांडला व त्याला नसीम खान, यशोमती ठाकूर आणि शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले.

 

बाळासाहेब थाेरात, वडेट्टीवार, गायकवाड यांच्या नावाची चर्चा
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड या तीन नावांची चर्चा झाली आणि त्यानंतर गटनेता निवडीचा अंतिम निर्णय राहुल गांधींकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व आमदारांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला. बाळासाहेब थोरात हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. विखे पाटील यांची भाजपशी जवळीक वाढल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि राहुल गांधी यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांच्यावर कदाचित प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...