आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi In Guwahati And Priyanka's Meeting In Lucknow : 'The Team Members Will Not Run In Assam': Rahul

राहुल यांनी गुवाहाटीत तर लखनऊत प्रियंकांची सभा, 'संघाचे चड्डीवाले आसामला चालवणार नाहीत' : राहुल

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नागरिकत्व कायदा नोटबंदीचा दुसरा टप्पा, ईशान्येत ते लागू होऊ देणार नाही : राहुल
  • देशात काँग्रेसने कार्यक्रमाद्वारे मोदींना केले लक्ष्य

​​​​​​लखनऊ/ नवी दिल्ली/ गुवाहाटी : आसामला नागपूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चड्डीवाले चालवणार नाहीत. आसामला तेथील जनताच चालवेल. आम्ही भाजप व संघाला आसामच्या इतिहास, भाषा व संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व संघावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने शनिवारी देशभरात पक्षाच्या १३५ व्या स्थापना दिन साजरा केला. सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये सभा घेतली. देशात सध्या वातावरण काय आहे? मी सांगतो. यांचा (भाजप) उद्देश आसाममधील जनतेत आपसांत भांडण लावण्याचा आहे. आसाम आणि देशातील जनतेला आपसात लढायला लावायचे. हे जेथे जातात. तेथे घृणा पसरवतात. परंतु आसाममध्ये घृणा आणखी वाढणार नाही. रागातून ती पुढे जाणार नाही. प्रेमाने पुढे वाटचाल करेल, असे राहुल यांनी सांगितले. राहुल म्हणाले, भारतात कोठेही डिटेन्शन सेंटर नाही, असे मोदींनी म्हटले होते. त्यानंतर मी एक व्हिडिआे ट्विट केला. तो डिटेन्शन सेंटरचा आहे. तो पाहून खोटे कोण बोलत आहे हे तुम्हीच ठरवावे. सीएए नोटबंदीपेक्षाही धोकादायक आहे. त्यातून मोदींच्या १५ निकटवर्तीय मित्रांनाच लाभ मिळणार आहे.

ध्वजाला सलामी : सोनिया गांधींनी पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला

स्थापनादिनी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला. यानिमित्त राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, के.सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, ए.के. अँटोनींसह इतर नेत्यांची उपस्थिती होती.

पारतंत्र्यासारखाच पुन्हा विचारांशी तीव्र लढा द्यावा लागतोय : प्रियंका

पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता. तेव्हा आपल्याला गोऱ्यांचा सामना करावा लागत होता. परंतु आज चोरांशी लढावे लागत आहे. देश व प्रदेशातील सरकार अहंकारी आहे. स्वातंंत्र्यसंग्रामावेळी लढावे लागले. आताही देशावर अशाच विचारांच्या विरोधात लढण्याची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली.प्रियंका भाजपचा नामोल्लेख न करता पुढे म्हणाल्या, आज सत्तेवर वेगळ्या शक्ती आहेत. त्यांच्याशी आपला इतिहासकाळापासून संघर्ष आहे. आज देशावर संकट आहे. आपण आवाज उठवला नाही तर आपण भेकड असल्याचे सिद्ध होईल. काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणाल्या, असंतोष देशाच्या कानाकोपऱ्यातून दिसू लागला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व एनआरसीच्या माध्यमातून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. तरुणांनी या कायद्याला विरोध केला तेव्हा त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली. वास्तविक हिंसाचार हा भेकडपणा दर्शवतो. त्यांचे खरे चेहरे देशातील जनतेने आेळखले आहेत.

काँग्रेसला आव्हान मंजूर उत्तर प्रदेशसह इतर राज्यांत भडकलेल्या हिंसाचाराबद्दल प्रियंका म्हणाल्या, आवाज उठवल्यावरून मुलांना मारहाण केली जात आहे. सपा व बसपाचा नामोल्लेख न करता इतर सरकारला घाबरू लागले आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...