आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS मानहानी: राहुल गांधींची शिवडी कोर्टात हजेरी, विधानावर राहुल गांधी ठाम, तरी निर्दोष असल्याचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथील शिवडी कोर्टात हजेरी लावली. यावेळी सुनावणी दरम्यान त्यांनी संघावर केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. संघावर आरोप केल्यानंतरही आपण मानहानी प्रकरणी निर्दोष आहोत असा दावा राहुल यांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गांधींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास कोर्टाने 15 हजारांचा जातमुचलक्यावर मंजुरी दिली आहे.

 

हे आहे प्रकरण
5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूत बाइकस्वारांनी दौरी लंकेश यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला. हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. या संदर्भात विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान राहुल यांनी एक ट्वीट केले होते. राहुल गांधींनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला जबाबदार धरले होते. त्यावरूनच दुखावलेले मुंबईतील स्वयंसेवक धृतीमान जोशी यांनी फेब्रुवारी महिन्यात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची खटला दाखल केला होता. त्याच प्रकरणाची राहुल यांच्या उपस्थितीत गुरुवारी सुनावणी झाली. परंतु, राहुल यांनी स्वतःला निर्दोष म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी बुधवारीच काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याची अधिकृत घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुंबईतील कोर्टात हजेरी लावली आहे.

 

राज्यात राहुल गांधींवर दुसरा मानहानीचा खटला
संघविरोधी आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात महाराष्ट्रात मानहानीचा खटला दाखल होण्याची ही दुसरी वेळ होती. 2017 मध्ये संघाचे कार्यकर्ते राजेश कुंते यांनी देखील राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचे म्हटले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, शिवडी येथे खटला दाखल करताना याचिकाकर्ते जोशी यांनी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि माकपचे सीताराम येचुरी यांच्यावर देखील खटला दाखल केला होता. यानंतर माझगाव कोर्टाने राहुल यांना समन्स बजावले होते. तसेच माकप आणि सोनिया गांधींविरुद्धचा खटला रद्द केला होता.

बातम्या आणखी आहेत...