मुद्द्यांचे बारकावे समजून / मुद्द्यांचे बारकावे समजून घेण्यासाठी राहुल गांधी घेत आहेत तज्ञांकडून शिकवणी, १५० तास मंथन

'माझे मत मांडण्याआधी तुम्हाला स्पष्टच सांगतो की, मी आजवर काँग्रेसला कधीही मत दिलेलं नाही. मी वाजपेयीजींचा प्रशंसक राहिलेलो आहे.' सुमारे ३० सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्तींच्या घोळक्यातील एका तज्ज्ञाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसमोर हे मत मांडले. मात्र राहुल यांचा चेहरा निर्विकार होता. त्यांनी स्मितहास्य केले आणि एक प्रकारे तुम्ही तुमचे मत निर्भीडपणे सांगा, असा संदेशच दिला.

Sep 07,2018 07:00:00 AM IST

नवी दिल्ली- 'माझे मत मांडण्याआधी तुम्हाला स्पष्टच सांगतो की, मी आजवर काँग्रेसला कधीही मत दिलेलं नाही. मी वाजपेयीजींचा प्रशंसक राहिलेलो आहे.' सुमारे ३० सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्तींच्या घोळक्यातील एका तज्ज्ञाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसमोर हे मत मांडले. मात्र राहुल यांचा चेहरा निर्विकार होता. त्यांनी स्मितहास्य केले आणि एक प्रकारे तुम्ही तुमचे मत निर्भीडपणे सांगा, असा संदेशच दिला. हा एक 'क्लास' होता, जो राहुल यांच्या दिल्लीतील १२ तुघलक रोडस्थित बंगल्यावर सुरू होता. यात सोशल मीडियावर काही मिनिटांतच पोस्ट व्हायरल होणाऱ्या ब्लॉगर, ट्विटर हँडलर्सना बोलावण्यात आले होते. कधी त्यांना लोकप्रियता मिळते तर कधी ट्रोल ब्रिगेड त्यांच्या कच्छपी लागते. राहुल यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिव्य मराठी नेटवर्कला सांगितले की, 'मुद्दे समजून घेणे' आणि 'मोठी जबाबदारी' (इशारा पीएमपदाकडे) स्वीकारण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी तज्ज्ञांसोबत अशा मंथनांचा सिलसिला सुरू केला. अशी अनेक सत्रे गतवर्षी काँग्रेसची धुरा हाती घेतल्यापासूनच सुरू झाली होती. आजवर ५० पेक्षा जास्त सत्रे झाली आहेत. अशा रीतीने पंतप्रधान होण्यासाठी त्यांची सुमारे १५० तासांची शिकवणी झाली आहे.


राफेलच्या व्यवहाराची बारकाईने माहिती ३६ राफेल लढावू विमानाच्या व्यवहारात घाेटाळ्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला अाहे. या व्यवहाराची बारकाईने माहिती घेण्यासाठी राहुल यांनी अनेक सत्रे अायाेजित केली. या सत्रांत लष्करी शस्त्रास्त्रांच्या खरेदीशी संबंधित माजी अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेतले. शस्त्रे खरेदीचे नियम, संरक्षण खात्यातील साहित्य खरेदीत खासगी कंपन्यांचा सहभाग किती असावा हेही जाणून घेतले. हवाई दलाच्या गरजेबाबतही माहिती घेतली. संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांच्या गाेपनीयतेपासून ते करारांपर्यंतची माहितीही राहुल यांनी जाणून घेतली.


तज्ज्ञांची संख्या मर्यादित
राहुल गांधी यांची साेशल मीडिया टीम सखाेल संशाेधन केल्यानंतरच मास्टर क्लाससाठी तज्ज्ञांची निवड करते. राहुल यांनी अापल्या टीमला निर्देश दिले अाहेत की, निवडण्यात येणाऱ्या तज्ज्ञांची संख्या मर्यादित असावी, जेणेकरून या सर्वांशी थेट संवाद करणे शक्य हाेईल. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल गांधींना वेगवेगळ्या विचारांशी परिचित करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या धाेरणाविराेधात विचार करणाऱ्या तज्ज्ञांनाही बाेलावले जाते. टीम राहुल या क्लासमध्ये येणाऱ्या तज्ज्ञांचे नाव गाेपनीय ठेवते, जेणेकरून ते काेणताही दबाव न घेता क्लासमध्ये सहभागी हाेऊ शकतील. या क्लासमध्ये सवाल-जवाबचा पॅटर्न ठरवण्यात अालेला नाही. अशा प्रकारे हाेणाऱ्या प्रत्येक सत्रातील प्रमुख मुद्द्यांच्या नाेंदी घेतल्या जात अाहेत. या संवादांचे पाॅवर पाइंट प्रझेंटेशनही तयार केले जाते.


दिल्लीबाहेरही हाेताहेत सत्रे
राजधानी दिल्लीत हाेणाऱ्या या सत्रांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे राहुल अाता इतर माेठ्या शहरातही अशा प्रकारचे सत्र अायाेजित करण्याचा विचार करत अाहेत. बंगळुरू, मुंबई, काेलकाता, जयपूसारख्या माेठ्या शहरांतील तज्ज्ञांपर्यंतही अापण पाेहोचू शकू हा त्यामागील उद्देश. म्हणजे असे तज्ज्ञ जे ‘लुटियन्स झाेन’पेक्षा वेगळा विचार करतात.

या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली शिकवणी
सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी सध्या ज्यांच्यावर देशाच्या समस्या, ज्यांच्यावर उपाय अशक्य आहे त्या समजून घेत आहेत. या समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी काय करता येईल याकडे ते लक्ष केंद्रित करत आहेत. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी विख्यात कृषितज्ज्ञांसोबत १० वेगवेगळ्या सत्रांत चर्चा केली आहे. रोजगारनिर्मितीवरही पाच सत्रे पार पडली आहेत. दलित, दुर्बळ घटक, महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्याबाबतही मंथन झालेले आहे. त्याशिवाय वेळोवेळी उद््भवणाऱ्या मुद्द्यांवरही वर्ग घेतले जात आहेत. उदा. जेव्हा सर्वाेच्च न्यायालयाचे ४ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा काँग्रेस अध्यक्षांनीही तत्काळ आपल्या पक्षातील तज्ज्ञ वकिलांचे मत घेतले होते. अनेक माजी न्यायमूर्तींसोबत विचारविनिमय केला. काही सत्रे प्रशासन व संस्थात्मक आराखड्यावरही झाली आहेत. यात राहुल यांनी माजी नोकरशहासांबत शासनातील बारीकसारीक बाबी जाणून घेतल्या. त्यांनी परराष्ट्र धोरण आणि डोकलाम मुद्द्यावर माजी मुत्सद्दी आणि थिंकटँक संस्थांशी जुळलेल्या लोकांसोबत सत्रे घेतली आहेत.

X