आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi, Lata Mangeshakr And Political Leaders Tweet On Shushma Swaraj Demise

सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत राहुल गांधी, लता मंगेशकरसह राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजकीय आणि बॉलीवूडसह इतर क्षेत्रांतील मान्यवरांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. 
 
> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले - सुषमाजींचे निधनाने वयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना कायम लक्षात ठेवले जाईल. माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत. ओम शांती 
 

  > राहुल गांधीनी ट्वीट केले - सुषमा स्वराज यांच्या अचानाक जाण्याने मला धक्काच बसला. त्या एक असामान्य राजनेत्या होत्या. तसेच त्या उत्तम खासदार आणि वक्ता देखील होत्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.    

    > लता मंगेशकर यांनी ट्वीट केले -  सुषमा स्वराज यांच्या जाण्याने मला धक्का बसला. त्या एक प्रभआ आणि इमानदार नेत्या होत्या. त्या संवेदनशील होत्या. त्यांना संगीत आणि कवितेची जाण होती. त्या माझ्या चांगल्या मैत्रिण होत्या. आपल्या परराष्ट्रमंत्री नेहमीच माझ्या आठवणीत राहील.     

    > मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले - आमची सुषमा दीदी सर्वांना सोडून निघून गेली. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जनतेची सेवा केली. जनसेवेची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली आहे. दीदी तुम्ही जिथेही असाल तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा हीच देवाकडे प्रार्थना आहे. ओम शांती  

  > कवी डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिले - भारतीय राजकारणातील एक राजकीय स्त्री अनंताता विलुप्त झाली आहे. जनभाषेची सुषमा आता समाप्त झाली. अटलजींनंतर सर्वाधिक संतुलित आणि सम्मोहक संसदीय वक्ताच्या वाणीने आता विराम घेतला आहे. देवाच्या आलोक सभेतील पदभार सांभाळा.    

 

सुषमाजींनी दिलेले योगदान अमुल्य आहे - ओम बिरला
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, की सुषमाजींनी भारतीय संस्कृतीला जगासमोर मांडले. एक खासदार तसेच एक मंत्र्याच्या रुपात त्यांचा कार्यकाळ देशासाठी अमुल्या राहीला आहे. परराष्ट्रमंत्रीच्या रुपातील त्यांचा कार्यकाळ नेहमीच आठवणीत राहील.  
 

मोठ्या बहिणीप्रमाणे काळजी घेतली - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले - सुषमाजींचे निधन हे वयक्तिक नुकसान आहे. आणीबाणीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्या भारतीय जनता पार्टीसोबतच राहिला. त्यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतली. मला वेळो-वेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या जाणे आमच्यासाठी आणि देशासाठी नुकसानदायक आहे.
 

इतक्या लवकर सोडून जातील असे वाटले नव्हते - गुलामनबी आझाद
काँग्रेस नेता गुलामनबी आझाद म्हणाले की - सुषमाजींच्या निधनाने आम्ही स्तब्ध आहोत. त्या आम्हाला इतक्या लवकर सोडून जातील असे वाटले नव्हते. 1977 मी युवक काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून मी त्यांना ओळखत होतो. आम्ही दोघेही एकमेकांना 42 वर्षांपासून ओळखत होतो. आम्ही दोघांनी एकमेकांना कधीच नावाने हाक मारली नाही. त्या मला भाऊ म्हणत आणि त्यांनी बहीण म्हणत होतो. 
 

बातम्या आणखी आहेत...