आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर- सध्या सर्वत्रच आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नेते जोगाजागी सभा घेत आहेत. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. अशात, चर्चा होत आहे राहुल गांधींची. काही दिवसांपूर्वीच कळाले की, राहुल गांधी परदेशी गेले आहेत. त्यावरच, या स्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. विरोधी पक्षासाठी हा प्रकार चांगला नाही,' अशा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. जत येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी शहा म्हणाले की, "लोकशाहीत विरोधी पक्षाचे खूप महत्त्व आहे. त्रिपुरात आम्ही रस्त्यावर उभे राहून भाजपचे 250 सदस्य बनवले. यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली. आज त्रिपुरात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेच होते. हा प्रकार विरोधी पक्षासाठी चांगला नाही." असे मत शहा यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, राज्यातील युतीच्या प्रचाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत युतीचे 220 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एका जवानाच्या बदल्यात शत्रूचे 10 सैनिक मारू
सांगलीतील सभेतून अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यास तीव्र विरोध केला होता. हे कलम हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र 5 ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चालली नाही किंबहुना चालवावी लागली नाही. यापुढे भारताचा एक जवान शहीद झाला तर त्याबदल्यात 10 शत्रू मारले जाणार आहेत, असे शहा यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.