आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Live Raichur Lateste News In Marathi

राहुल लाइव्ह: एका चौकीदाराच्या हातात किल्ली दिल्यास तो तुमचे घर लुटू शकतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायचूर. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी कर्नाटकच्या रायचूर होते. त्यांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. गुजरातमधील महिलेच्या हेरगिरीचाही मुद्दा उचलला. मोदी त्यांच्या सभांमध्ये देशाचा चौकीदार बनण्याची भाषा करतात. त्यावर एक चौकीदार तुमचे घरही लुटू शकतो, असे राहुल म्हणाले.
‘ज्ञान आमच्याकडे नाही तर तुमच्याकडेच आहे. एका व्यक्तीला चौकीदार बनवा, तो संपूर्ण देश बदलेल, असे भाजप म्हणते.आम्ही कोट्यवधी लोकांना देशाचा चौकीदार बनवू इच्छितो. त्यांना अधिकार देऊ इच्छितो. देशाला कोण्या एका चौकीदाराची गरजच नाही. तुम्ही जर एका चौकीदाराकडे घराची किल्ली दिली तर तो घर लुटूही शकतो.’
इंडिया शायनिंगवाल्यांनीच महिला आरक्षण रोखले
‘जोपर्यंत महिलांना सामर्थ्य मिळत नाही, तोपर्यंत देश सुपरपॉवर बनू शकत नाही. आम्ही महिलांना संसदेत आरक्षण देणार होतो. परंतु गुजरात मॉडेलवाले, इंडिया शायनिंगवाल्या लोकांनी ते रोखून धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने पंचायत राजमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांमधील त्यांचे प्रतिनिधीत्व वाढले आहे. काँग्रेसचे सरकार आले तर महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ.’
अडवाणी आता भाजपचे मोठे नेते नव्हे, छोटे नेते झाले आहेत
‘तुम्हाला आठवत असेल की भाजपचे मोठे नेते अडवाणीजी. ते आता मोठे राहिलेले नाहीत. आधी ते मोठे नेते होते. आता त्यांना छोटा नेता करण्यात आले आहे. 371 (जे) विधेयक मंजूर झाले तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणत होते. आम्ही ते विधेयक मंजूर केले. आम्ही आश्वासन पूर्ण केले. एकदा आम्ही जे सांगतो, ते आम्ही करूनच दाखवतो.’
आम्ही दुर्बलांचे शिपाई
‘काँग्रेस हा एका जातीचा किंवा धर्माचा पक्ष नाही. काँग्रेस सर्वांचे सरकार चालवते. आम्हाला कोणत्याही मॉडेलची गरज नाही. कर्नाटकमध्ये गरीब, दुर्बल लोकांचे मॉडेल आहे. आमचे राजकारण हे तुमचे राजकारण आहे. आम्ही एखाद्या उद्योगपतीची, केवळ दोन-तीन लोकांची, इंडिया शायनिंगची लढाई लढणारे आम्ही नाहीत. जोपर्यंत लोकांची घरे उजळणार नाहीत, तोपर्यंत भारत चमकणार नाही.’
15 कोटींची गरिबी दूर केली
‘2004 मध्ये इंडिया शायनिंग अपयशी झाले. आमचे सरकार आले. ‘बेल्लारी’ जनता पार्टीचे सरकार आले नाही. गरीब आणि दुर्बल लोकांचे सरकार आले. 10 वर्षांत काँग्रेसने 15 कोटी लोकांची गरिबी दूर केली. आता पुढील पाच वर्षांत 70 कोटी लोक मध्यमवर्गात आणू.’