आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Met Kashmiri Woman In Plane Priyanka Gandhi Share Rahul Video Viral

विमानात काश्मीरी महिलेने राहुल गांधींसमोर मांडली व्यथा, म्हणाली- 'माझा भाऊ मुलाला शोधण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे त्याला पकडून नेले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी आठ पक्षांच्या 11 नेत्यांसोबत श्रीनगरला गेले. येथे सुरक्षेच्या कारणामुळे सगळ्यांना एअरपोर्टवरुनच परत पाठवले. या दरम्यान विमानात एक काश्मिरी महिला राहुल यांना भेटली आणि आपली व्यथा मांडली. महिला म्हणाली, लहान मुलांना शाळेत जाता येत नाहीये. जर ते घराबाहेर पडले, तर त्यांना पकडले जात आहे. हा व्हिडिओ काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी शेअर केला.

विमानात महिला म्हणाली, "आम्हाला पाहता येत नाही. लहान मुले आहेत, त्यांना शाळेत जाता येत नाहीये. त्यांना एकमेकांसोबत खेळता येत नाहीये. माझ्या भावाला ह्रदयाचा आजार आहे, तो आपल्या मुलाला शोधण्यासाठी बाहेर गेला होता, तेव्हा त्याला पकडून नेले. 10 दिवस त्याचा काहीच ठाम पत्ता नव्हता. आम्ही खूप त्रासात आहोत."
 

प्रियंकाने शेअर केला व्हिडिओ
प्रियंकाने व्हिडिओ शेअर करत लिहीले- असे किती दिवस चालणार आहे? या त्या लाखो लोकांपैकी एक आहेत, ज्यांना राष्ट्रवादाच्या नावाने गप्प केले आहे. काश्मीरमध्ये लोकशाहीविरोधात काम सुरू आहे, हे राजकीय आणि देशविरोधी आहे. याच्याविरोद्ध आवाज उठवणे आपले कर्तव्य आहे.