आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress Manifesto

तुम्हीच सांगा, कॉंग्रेसने 2009 च्या जाहिरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने दिलेली 90 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) केला. गेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील प्रमुख आश्वासने आम्ही खाली दिलेली आहेत. त्यातील किती आश्वासने पूर्ण झाली, हे तुम्हीच ठरवा, आणि आम्हाला जरूर कळवा.
2009 लोकसभा निवडणुकांमधील कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील ठळक मुद्दे
- प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त संरक्षण देण्याचा प्रयत्न.
- संरक्षण सज्जतेवर अधिक भर देणार. संरक्षण दल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाचा विचार केला जाईल.
- धोरणात्मक सुधारणांची गती वाढविली जाईल.
- नरेगा योजना यशस्वी करण्यासाठी पाऊले उचलली जातील. या योजनेला आणखी पुढे नेले जाईल.
- नरेगाप्रमाणेच राष्ट्रीय अन्न संरक्षण कायदा आणला जाईल.
- सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.
- ज्यांना विशिष्ट धोके आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात येईल.
- गुणपत्तापूर्ण शिक्षण सर्वांना देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- देशव्यापी स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविला जाईल.
- शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची व्याप्ती वाढविली जाईल.
- सहकार क्षेत्राचे कामकाज अधिक लोकशाहीपूर्ण आणि आधुनिक केले जाईल.
- समाजातील कमकुवत घटकांचे सबलीकरण करण्यावर भर दिला जाईल.
- जातीभेद आणि कम्युनिलिझम मिटविण्यासाठी कटिबद्ध राहणार.
- बालकांच्या, विशेष करून मुलींच्या विशेष गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
- पंचायत संस्था आर्थिकदृष्या सक्षम केल्या जातील.
- येत्या तीन वर्षांत देशातील सर्व गावांना ब्रॉडबॅंड नेटवर्कने जोडले जाईल.
- लहान आणि मध्यम व्यवसायांना संरक्षण दिले जाईल.
- महागाई रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या जातील. देशाच्या जीडीपीत वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- 1 एप्रिल 2010 पासून गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स सुरू केला जाईल.
- शहरातील गर्व्हनन्सवर विशेष भर दिला जाईल.
- तरुणांचा लोकशाहीतील सहभाग वाढविला जाईल.
- भारतातील नैसर्गिक संसाधनांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलली जातील.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलला जाईल.
- न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ज्युडिशिअरी रिफॉर्म राबविले जातील.
- जनतेच्या धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी संवेदनशीर राहणार.
- जनतेला पुरेशी वीज देण्याचा प्रयत्न करणार.
- आपली संस्कृती टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी आणखी पाऊले उचलली जातील.
- भारताच्या हिताचे आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबविले जातील.
- अनिवासी भारतीयांचा भारताच्या विकासातील सहभाग वाढविला जाईल.