आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डीझेलवरून मोदींवर केली टीका, पण ज्योतिरादित्य सिंधियांवर एक शब्दही बोलले नाहीत राहुल गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल म्हणाले- काँग्रेसचे सरकार पाडण्यात व्यस्त पीएम मोदी
  • इंधन दर घसरल्याचा नागरिकांना सुद्धा फायदा करून द्या

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केवळ काँग्रेसची सरकारे पाडण्यात मशगूल असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींनी बुधवारी ट्वीट करून मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसचे सरकार पाडण्यात पीएम मोदी मशगूल आहेत. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या. इतक्या कमी की देशात 60 रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर करून नागरिकांना दिलासा देता येईल.