आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींकडून राजीनाम्याचा प्रस्ताव! पत्रकार परिषदेत पराभव मान्य करत नरेंद्र मोदी, भाजपला दिल्या शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असल्याचे पाहता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पराभव मान्य केला. निकालाच्या दिवशी काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा स्पष्ट विजय दिसून आला. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक विचारधारेचा लढा होता. तसेच हा लढा कायम राहील. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरू नये असेही राहुल म्हणाले आहेत. या पत्रकार परिषदेच्या अवघ्या काही मिनिटांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 

 


स्मृतीजी अमेठीची प्रेमाने काळजी घ्या...
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना अमेठीतून आपला पराभव मान्य केला. स्मृती इराणी यांचा अमेठीतून विजय झाला आहे. निश्चितच त्या अतिशय प्रेमाने अमेठीची काळजी घेतील अशी अपेक्षा करतो असे राहुल गांधी म्हणाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाड येथूनही लोकसभा लढवली. त्या ठिकाणी त्यांना 7 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने आघाडी मिळाली. तरीही राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे, केवळ काँग्रेसच नव्हे तर राहुल गांधी यांच्यासाठी देखील अमेठीचा पराभव गंभीर चिंतेचा आणि आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
 

बातम्या आणखी आहेत...