आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसूद अझरला कोणी सोडले? राहुल गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला होता. त्याविषयी मला एक छोटा प्रश्न पडला आहे. हल्ला करणारा कोण होता? या सीआरपीएफ शहिदांना कोणी मारले? जैश-ए-मोहंमदच्या म्होरक्याचे नाव काय.. मसूद अझर. मग भारताच्या तुरुंगातून मसूद अझरला पाकिस्तानात कोणी सोडले? 


भाजपच्या सरकारने त्यास कंदहारला पाठवले नव्हते? पंतप्रधान आपल्या भाषणांतून या मुद्द्यावर स्पष्टीकरण का देत नाहीत?  असे प्रश्न राहुल गांधी यांनी हावेरी येथील जाहीर सभेतून उपस्थित केले. इंटरनेटवर जाऊन ही माहिती तुम्हीही घेऊ शकता. त्यात कंदहार विमानतळावर नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल त्यात अझरसोबत दिसतात. तुम्ही ते पाहू शकता. 

बातम्या आणखी आहेत...