आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ वक्तव्यावर राहुल गांधींचा माफी मागण्यास नकार, 'मोदींनी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटले होते, माझ्याजवळ क्लिप आहे'- राहुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी गुरुवारी झारखंडमधील सभेत मेक इन इंडियाला रेप इन इंडिया म्हटले होते
  • शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी लोकसभेत राहुल गांधींच्या माफीची मागणीक केली होती
  • भाजप पूर्वोत्तरमधील आंदोलनवरुन लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा उठवत आहे- राहुल

नवी दिल्ली- राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी राहुल गांधींनी माफी मागण्याची मागणी केली. परंतू राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला आहे. यासोबतच त्यांनी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलेल्या मोदींच्या वक्तव्याचाही उल्लेख केला.

राहुल गांधी म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पूर्वोत्तरमध्ये आंदोलन पेटवले. त्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मी परत म्हणतो, मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, आम्हाला वाटलं मेक इन इंडिया होईल. पण, सध्या देशात रेप इन इंडिया आहे. माझ्याजवळ एक क्लिप आहे, ज्यात मोदींनी दिल्लीला रेप कॅपिटल म्हटले होते."

‘भाजप आमदाराने बलात्कार केला’

राहुल पुढे म्हणाले, ‘‘उन्नावमध्ये भाजपच्या आमदाराने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला अपघातात मारण्याचा प्रयत्न केला, यावर मोदी काहीच बोलत नाहीत. मोदी हिंसेचा वापर करतात. देशात सर्वत्र हिंसा होत आहे. काश्मीर आणि नॉर्थ ईस्टमध्ये सध्या प्रचंड हिंसा भडकली आहे."

‘मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली’
 
पुढे ते म्हणाले, "आज रघुराम राजन मला म्हणाले की, अमेरीका-युरोपमध्ये भारताबाबत बोलले जात नाहीये. जेव्हा कधी भारतावर चर्चा होते, तेव्हा अर्थव्यवस्थेवर न होता फक्त अपराधावर होते. मोदींनी भारताची अर्थव्यवस्था नष्ट केली."