आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Resignation Will Be Suicidal For Congress, Lalu Prasad Yadav Suggests

आत्मघातकी ठरू शकतो राहुल यांचा राजीनामा, त्यांनी भाजपच्या जाळ्यात अडकू नये -लालूंचा काँग्रेसला सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यास त्यांचा हा निर्णय पक्षासाठी आत्मघातकी ठरू शकतो. भाजपला हेच हवे आहे. राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जाळ्यात अडकू नये असा सल्ला राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्यावर ठाम असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाने त्यांचा हा प्रस्ताव आधीच फेटाळला. सोबतच, त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लालूंची ही प्रतिक्रिया आली आहे.


चारा घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले लालू प्रसाद यादव उपचारासाठी रिम्स रुग्णालयात आले होते. या दरम्यान, एका इंग्रजी दैनिकाने त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या लेखकाचा दाखल देऊन ही माहिती दिली. या दैनिकाच्या वृत्तानुसार, लालू म्हणाले, की राहुल गांधींनी राजीनामा द्यावा हेच भाजपला हवे आहे. राहुल आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास ते भाजपच्या जाळ्यात अडकतील.


राहुल यांचा हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधी सर्वच ताकदींना घातक ठरेल. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसवर वंशवादाची टीका होत असताना राहुल गांधींनीही आपल्या नेत्यांच्या तिकीट वाटपावर टीका केली होती. तसेच आपल्या राजीनाम्यानंतर गांधी-नेहरु कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला जबाबदारी देण्यात यावी असे व्यक्त केले. परंतु, यात काँग्रेसचेच नुकसान आहे असे लालू म्हणाले आहेत. लालूंच्या मते, गांधी-नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले तरीही भाजप आणि मोदी त्यावर टीका करत राहतील. बाहेरील व्यक्ती अध्यक्ष बनल्यानंतरही त्याचे रिमोट गांधी कुटुंबाच्या हातात आहे असे आरोप केले जातील. हा खेळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत चालत राहील. त्यामुळे, भाजपला अशी संधीच देऊ नये.