आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Say Jammu & Kashmir Is India’s Internal Issue Pakistan Is Terrorism Supporter

सरकारसोबत मतभेद असतील, पण काश्मीर आमचा अंतर्गत मुद्दा आहे; राहुल गांधींनी पाकला सुनावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीरात कलम 370 रद्द झाल्याच्या 23 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली. तसेच पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. सरकारसोबत काही मुद्द्यावर राजकीय मतभेद असतील. परंतु, काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. पाकिस्तान येथे हिंसाचार पसरवण्यासाठी दहशतवाद्यांचे समर्थन करत आहे असेही ते पुढे म्हणाले. राहुल गांधींच्या या विचारांचे शशी थरुर यांनीही समर्थन केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राहुल गांधी यांच्या नावाचा खोटा प्रचार करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली.

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्वीट करून लिहिले, "मी या सरकारच्या अनेक मुद्द्यांवर समर्थन देत नाही. परंतु, हे स्पष्ट करू इच्छितो की काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. यासंदर्भात पाकिसतानच नव्हे, तर कुठल्याही देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पाकिस्तान हाच हिंसाचार पसरवण्यासाठी दहशतवाद्यांचे समर्थन करत आहे. जगभरात पाकिस्तान दहशतवाद्यांचा समर्थक देश म्हणून कुप्रसिद्ध आहे."

पाककडून राहुल गांधींच्या नावाचा गैरवापर
दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, ''पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात काश्मीरवर आपले खोटारडेपणा सत्य असल्याचे दाखवण्यासाठी राहुल गांधींच्या नावाचा गैरवापर करत आहे. त्यामुळेच, राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. जम्मू-कश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य घटक आहेत आणि नेहमीच राहतील."

बातम्या आणखी आहेत...