आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी म्हणाले, माझे लग्न आधीच झाले; 2019 मध्ये BJP पुन्हा सत्तेवर येणार नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लग्नाच्या प्रश्नावर माझे लग्न आधीच झाले असे उत्तर दिले आहे. हैदराबाद येथे संपादकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी आपला विवाह कांग्रेसशी झाला असे म्हटले आहे. ते सध्या दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आहेत. याच पत्रकार परिषदेत त्यांनी 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी किंवा देशात भाजपची सत्ता आता पुन्हा येणार नाही असे राहुल यांनी म्हटले आहे. सोबतच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 230 जागांवर सुद्धा पोहोचू शकणार नाही असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले आहेत. काँग्रेस आणि आघाडीची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान कोण होणार यावर मात्र, त्यांनी उत्तर देणे टाळले. 


राज्यांमध्येही आघाडीसाठी काँग्रेस तयार
राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे, काँग्रेस केवळ केंद्रातच नव्हे, तर राज्यांत होणाऱ्या निवडणुकीत देखील आघाडी करण्यासाठी तयार आहे असे म्हटले आहे. काँग्रेसला आपल्या विचारांच्या पक्षांसोबत आघाडी करण्यात काहीच हरकत नाही. तेलंगणात सुद्धा काँग्रेसची सत्ता येईल असा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. आंध्रप्रदेश संदर्भात विचारले असता त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस आपली परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात आहे असे ते पुढे म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आंध्र प्रदेशातून काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...