आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रफाल : 'पंतप्रधान मोदींनी दलालाची भूमिका निभावली, डीलच्या 10 दिवसांपूर्वीच अनिल अंबानींना याची माहिती होती'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा राफेल डीलवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी एक ईमेल दाखवला. ते म्हणाले- "यामध्ये एअरबसच्या एका एक्झिक्युटिव्हने लिहिले आहे की, अनिल अंबानी फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांना भेटले होते. ते एक्झिक्युटिव्हला म्हणाले- 10 दिवसांनी रफाल डील होणार असून ती मिळवण्यासाठी जात आहे." राहुल यांनी असा आरोपही केला आहे की, या डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानीसाठी दलालाची भूमिका निभावली.


राहुल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ज्या डीलविषयी देशाच्या संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव आणि हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांना माहिती नव्हती, त्याविषयी अनिल अंबानी यांना माहिती कशी काय मिळाली?

बातम्या आणखी आहेत...