आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-गोडसेची सारखीच विचारधारा, नथुरामवर त्यांचा विश्वास आहे असे मान्य करण्याचे पंतप्रधानांमध्ये धाडस नाही - राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी म्हणाले - कोण भारतीय आहे आणि कोण नाही याचा परवाना नरेंद्र मोदींना कोणी दिला
  • राहुल यांनी मोर्चाला संबोधित करण्यापूर्वी सीएएविरोधात 'संविधान बचाव' रॅली काढली

तिरुवनंतपुरम - नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांची विचारधारा सारखीच आहे. परंतु गोडसेवर त्यांचा विश्वास आहे असे म्हणण्याची त्यांच्यात हिम्मत नसल्याचे काँग्रेस नेता आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी यांनी केले आहे. वायनाडच्या कलपेटा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील एका सभेत बोलत होते. या सभेपूर्वी कलपेटा येथे कायद्याविरोधात 2 किमीचा 'संविधान बचाओ' मोर्चा काढण्यात आला होता. राहूल गांधी म्हणाले की, "देशातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भाग पाडले जात आहे. मी एक भारतीय आहे याचा निर्णय करणारे मोदी कोण आहेत? कोण भारतीय आहेत आणि कोण नाही याचे प्रमाणपत्र त्यांना कोणी दिले. असा सवालही राहूल यांनी यावेळी विचारला. मी भारतीय आहे आणि मला ते सिद्ध करण्याची काहीही आवश्यकता नाही" असे राहूल यावेळी म्हणाले. 

मोदींचे फक्त स्वतःवर प्रेम

राहुल गांधींच्या मते, "नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीची हत्या केली कारण त्याचा कोणावर विश्वास नव्हता. त्याचे स्वतःवरच प्रेम होते. त्याला कोणाहीची पर्वा नव्हती. आपले पंतप्रधान देखील अशाचप्रकारचे आहेत. ते फक्त स्वतःवर प्रेम करतात आणि स्वतःवर विश्वास ठेवतात."एनआरसी, सीएए आणि आसाम पेटवल्याने नोकऱ्या मिळणार नाहीत

पुढे बोलताना ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांच्याकडे बेरोजगारी आणि नोकऱ्याविषयी विचारणा केली  असता ते तुमचे लक्ष विचलित करतात. एनआरसी,, सीएए आणि आसाम पेटवल्याने नोकऱ्या मिळणार नाहीत. तसेच काश्मिरमधील अस्थिरता कमी होणार नाही."
 

बातम्या आणखी आहेत...