आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी नागरिकत्व कायद्याबाबत दहा ओळी बाेलून दाखवाव्यात : नड्डा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंदूर, बंगळुरूसह देशातील काही शहरांत तिरंगा रॅली काढून कायद्यास पाठिंबा

लखनऊ/इंदूर- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी भाजप, संघ, लोक अधिकार मंचसह अनेक संघटनांच्या वतीने देशातील अनेक मोठ्या शहरांत रॅली काढण्यात आल्या. इंदूरमध्येही रॅली काढण्यात आली. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी झाले. नड्डा यांनी सिंधी आणि शीख समाजाच्या त्या लोकांची भेट घेतली, जे नागरिकत्वाची मागणी करत आहेत. नड्डा यांनी रॅलीला मार्गदर्शन करताना सांगितले की, मी राहुल गांधींना या कायद्याबाबत दहा ओळी बोलण्याचे आव्हान देत आहे. तर, कर्नाटकातील बंगळुरूत, बिहारमधील मुझफ्फरपूरमध्येही कायद्याच्या बाजूने रॅली काढण्यात आली.
नव्या नागरिकत्व कायद्याच्या विराेधात रविवारी तामिळनाडूत आंदाेलन सुरूच हाेते. मुस्लिम संघटनेच्या पाचशे लाेकांनी निदर्शने केली. या आंदाेलनात महिलांचाही सहभाग हाेता. माकपचे सदस्यही त्यात सहभागी हाेते. 


चेन्नईतील वल्लुराकाेटम, थेनी या भागात निदर्शकांनी आंदाेलन केले. मदुराईत कॅम्पस फ्रंट आॅफ इंडिया या संघटनेने आंदाेलन केले. ही निदर्शने पाेलिस परवानगीविना करण्यात आली. त्यामुळे पाेलिसांनी सुमारे २ हजारांवर लाेकांच्या विराेधात गुन्हा दाखल केला. वास्तविक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या लाेकांवर पाेलिसांनी कारवाई केली. त्यात काही गैर केलेले नाही, असे भाजपचे नेते एल. गणेशन यांनी पत्रकारांना सांगितले.दुसरीकडे नागरिकत्व कायद्याच्या विराेधात उत्तर प्रदेशातील आंदाेलनातील मृतांची संख्या १६ वर पाेहाेचली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी आतापर्यंत १०२ जणांचा अटक केली आहे. या घटनांत आतापर्यंत ३५ पाेलिस जखमी झाले. बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री म्हणाले- भारताचा अंतर्गत मुद्दा, आम्ही चिंतित

बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री अब्दुल मोमेन यांनी सांगितले की, नागरिकत्व कायदा आणि एनआरसी अंतर्गत मुद्दे आहेत. मात्र, तेथील अनिश्चिततेची स्थिती शेजारी देशांवर प्रभाव टाकू शकते. तणाव कमी होईल आणि भारत या समस्येतून मार्ग काढेल, अशी मोमेन यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर, पर्यटन संस्थांच्या माहितीनुसार निदर्शनांमुळे अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना भारतात जाण्यास मनाई केली आहे. याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.

कर्नाटक : राज्य सरकारने १० लाख रुपयांची मदत देण्याचे केले जाहीर 


कर्नाटक सरकारने नागरिकत्व कायद्याच्या विराेधातील संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या संघर्षात किमान दाेन जणांचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला अशी मदत दिली जाणार आहे.पीडितांच्या नातेवाइकांना मदतीबद्दलच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी पत्रकारांना दिली. येदियुरप्पा यांनी बंगळुरूमधील मृतांच्या नातेवाइकांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेच्या चाैकशीचे आदेश देण्यात आली आहे. ही चाैकशी पूर्णपणे अराजकीय स्वरूपाची असेल, याची दक्षता घेतली जाईल. मंगळुरूमधील धुमश्चक्रीत पाेलिसांनी गाेळीबार केला हाेता. काही लाेकांनी नवीन नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम केले. त्यातही काँग्रेसने या मुद्यावर गाेंधळाची स्थिती निर्माण केली आहे. अशा लाेकांना माेदी सरकारची प्रतिमा मलिन करायची आहे. आता काँग्रेसचे लाेक रस्त्यावर उतरले आहेत. त्यावरून या अस्थिरतेमागे काँग्रेस आहे, हे स्पष्ट हाेते. नवीन नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्या ६ हजार लाेकांची आेळख पटवण्याच्या कामात सध्या उत्तर प्रदेशातील पाेलिस व्यग्र झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पाेलिस अधीक्षक प्रभाकर चाैधरी यांनी दिली. छायाचित्र व व्हिडिआे फुटेजच्या माध्यमातून अशा लाेकांची आेळख पटवण्याचे काम सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...