आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Trolled By Users For Commenting On Dog Squad On International Yoga Day

राहुल गांधी परत एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, श्वान पथक आणि जवानांच्या योगाची उडवली खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी संसदेत मोबाईलमध्ये व्यस्त राहिल्यामुळे राहुल गांधींना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले होते, ते प्रकरण होत नाही तेच राहुल आथा नव्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सगळीकडे योगासने करण्यात आली. लष्करातील श्वान पथक आणि जवानांनीही योग दिन साजरा केला. पण श्वान पथक आणि जवानांच्या योगाचे फोटो शेअर करत New India असे म्हणत राहुल गांधींनी याची खिल्ली उडवली आहे.


मध्य प्रदेशातील इंदूरचे आमदार रमेश मेंडोला यांनीही राहुल गांधींना त्यांचे जुने ट्वीट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ऑक्टोबर 2017 मध्ये एक ट्वीट केले होते, ज्यात ते म्हणाले होते की लोक मला विचारतात, तुमचे ट्वीट कोण करतो? तर माझा कुत्रा Pidi  माझे ट्वीट करतो, असे राहुल म्हणाले होते. याच ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत रमेश मेंडोला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

 

 

 

 


श्वान पथकांकडून चीनच्या हजारो किमीच्या सीमेवर सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून पहारा दिला जातो. गेल्या वर्षी दोन श्वानांचा आयटीबीपीकडून सन्मानही करण्यात आला होता. आम्हाला या श्वानांवर गर्व आहे, असेही रमेश मेंडोला म्हटले.