आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, काँग्रेस अध्यक्षांनी दिली अशी प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्वीट करताना राहुल यांच्या आरोग्य आणि दीर्घायूची कामना केली. काँग्रेसचे युवा नेते म्हणवले जात असले तरी राहुल गांधी बुधवारी 49 वर्षांचे झाले आहेत. 1970 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. राहुल यांनी देखील पंतप्रधानांच्या ट्वीटला उत्तर देत त्यांचे आभार मानले आहे. राहुल यांना शुभेच्छा देताना पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि सहकाऱ्यांसह विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

 


राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर #HappyBirthdayRahulGandhi आणि #IAmRahulGandhi हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. काँग्रेस अध्यक्षांच्या वाढदिवशी काँग्रेसच्या वतीने एक खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंट हा व्हिडिओ शेअर देखील केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...