आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Urges Party Workers, Do Nदt Get Disheartened By Fake Exit Polls Ahead Counting

लोकसभा निवडणूकः मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी राहुल गांधी कार्यकर्त्यांना म्हणाले, एक्झिट पोलच्या अफवांवर निराश होऊ नका, पक्षावर विश्वास ठेवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुढील 24 तास खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे, सतर्क राहा असे त्यांनी सांगितले. देशभरातील विविध एक्झिट पोल्समध्ये भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यावर निराश होऊ नका. अशा स्वरुपाचे एक्झिट पोलस केवळ नकारात्मक प्रचाराचा भाग आहेत, काँग्रेसवर विश्वास ठेवा, आपली मेहनत वाया जाणार नाही असा दिलासा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

 

 


लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 9 एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असे दाखवण्यात आले आहे. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जल्लोष सुरू केला. अनेक ठिकाणी विजयापूर्वीच मिठाई वाटण्याची तयारी सुरू झाली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले आहे. ईव्हीएमवर सवाल उपस्थित करणारे विरोधक आणखी सक्रीय झाले. तत्पूर्वी मंगळवारी काँग्रेस, तेदेप, तृणमूल आणि बसप यांच्यासह 22 विरोधीपक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. तसेच व्हीव्हीपॅट मॅच करतनाच्या मतांची मोजणी आधी करण्यात यावी अशी मागणी केली. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, की विधानसभा मतदार संघातील 5 पोलिस स्टेशनपैकी एकावरही घोळ दिसून आल्यास त्या ठिकाणी 100 टक्के व्हीव्हीपॅट मॅचिंग करून पाहण्यात यावी.