आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राहुल गांधी महाराष्ट्रात, गांधीजींच्या जयंतिनिमित्त अयोजित पदयात्रेत सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर आणि पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी काही काळ मीडियापासून आणि राजकारणापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. पण, आता हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी परत एकदा सक्रिय होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राहुल गांधींचीही उपस्थिती असेल.

पदयात्रेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित असतील.बातम्या आणखी आहेत...