आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Will Remain The President Of The Party, The News Spread On The Media Is Wrong Congress

राहुल गांधीच राहणार पक्षाचे अध्यक्ष, माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या -काँग्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधीच राहतील. त्यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. सोबतच, राहुल गांधी यांना अमेठी येथील जागा सुद्धा गमवावी लागली. त्यामुळे, निकालांच्याच दिवशी त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. यानंतर पक्षाने तो फेटाळूनही लावला. परंतु, पक्षाने नकार दिला तरीही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत अशा चर्चा आहेत.

 

 


काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून राहुल गांधींची मनधरणी!
काँग्रेस पक्षाकडून राहुल यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले जात असले तरीही दिल्लीतील हालचालींना पुन्हा वेग आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी अजुनही पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्यावर ठाम असून काँग्रेसचे नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, मंगळवारी सकाळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. इतर नेत्यांमध्ये राजस्थानचे उप-मुख्यमंत्री सचिन पायलट यांचा देखील समावेश आहे.