Home | International | Other Country | Rahul Gandhi's big allegation On BJP Leaders About Relation With Wanted Mallya

विजय माल्या भारत सोडण्याआधी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटला होता: लंडनमध्ये राहुल गांधींचा आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 26, 2018, 09:40 AM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्यावरून राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर लंडनमध्ये हल्लाबोल केला.

 • Rahul Gandhi's big allegation On BJP Leaders About Relation With Wanted Mallya
  राहुल गांधींनी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात भाग घेतला.
  राहुल म्हणाले- मोदी सरकार बँकांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींविरुद्ध कारवाई करत नाही.

  लंडन - एसबीआयसहित 17 भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या मद्य व्यावसायिक विजय माल्ल्यावरून राहुल गांधींनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. राहुल यांनी शनिवारी येथील एका कार्यक्रमात आरोप केला की, माल्ल्या भारत सोडून जाण्याआधी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटला होता. याची कागदपत्रेही उपलब्ध आहेत. तथापि, त्यांनी भाजप नेत्यांची नावे सांगण्यास नकार दिला. माल्ल्या 2016 मध्ये भारत सोडून लंडनला पळून गेला होता. त्याला परत आणण्यासाठी भारतीय संस्था इंग्लंडमध्ये कायदेशीर लढाई लढत आहेत.

  राहुल गांधींनी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात म्हटले की, मोदी सरकार भारतीय बँकांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींविरुद्ध कोणतेही कडक पाऊल उचलत नाही. यादरम्यान त्यांनी पीएनबी घोटाळ्याचा मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे नाव घेतले. त्यांनी आरोप केला की, नीरव-मेहुलसोबत पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध कार्रवाई नाही करण्यात आली. त्यांनी माल्ल्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट देण्याच्या प्रश्नावर म्हटले की, असे झाले नव्हते पाहिजे. न्याय सर्वांना समान भेटला पाहिजे. वास्तविक, माल्ल्याच्या प्रत्यार्पण केसच्या सुनावणीदरम्यान ब्रिटेनच्या कोर्टाने भारताला त्या आर्थर रोड जेलचा व्हिडिओ दाखवण्यास सांगितले होते, जेथे त्याला ठेवले जाऊ शकते.

  मोदी आणि ट्रम्पसारखे नेते का जिंकतात:
  राहुल म्हणाले की, लोकं या नेत्यांचे समर्थन करतात कारण त्यांच्याकडे नोकरी नाही. यामुळे ते संतप्त आहेत. निराकरण करण्याऐवजी हे नेते तो राग वाढवतात आणि देशाला नुकसान पोहोचवत आहेत. राहुल म्हणाले की, भारतात बेरोजगारीचे मोठे संकट आहे आणि भारताचे पंतप्रधानांना ते स्वीकार करायचे नाही.

Trending