• Home
  • National
  • Rahul Gandhi's election moves if we come in power, we will be give Rs. 72 thousand rupees per year to the 5 crore poor families

काँग्रेसचा ‘न्याय’; सत्तेत आल्यास ५ कोटी गरीब कुटुंबीयांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देणार

Mar 26,2019 08:51:00 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस सत्तेत आल्यास २०% गरीब कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये किमान उत्पन्नापोटी दिले जातील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. यामुळे ५ कोटी कुटुंबांतील २५ कोटी लाेकांना फायदा होईल. इंदिरा गांधी यांनी ४८ वर्षांपूर्वी १९७१ मध्ये ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा दिली होती. काँग्रेसच्या किमान उत्पन्न हमी योजनेची घोषणा करताना राहुल म्हणाले की, प्रत्येक गरीब कुटुंबाचे मासिक उत्पन्न किमान १२ हजार रुपये राहील हे यात निश्चित केले जाईल. एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न ६ हजार असेल तर त्यांना ६ हजार रुपये सरकार देईल. जोपर्यंत कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजार होत नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहील. राहुल म्हणाले, काँग्रेसने मनरेगाच्या माध्यमातून पहिला आघात करून १४ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. आता २५ कोटी लोकांच्या गरिबीवर दुसरा आणि शेवटचा आघात होईल.

अशी असेल योजना

दोन टप्प्यांत प्रत्येकी अडीच कोटी कुटुंबांना फायदा
योजना लागू करण्यापूर्वी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. योजना दोन टप्प्यांत राबवली जाईल. प्रत्येक टप्प्यात अडीच हजार कुटुंबे असतील. या कुटुंबाशी संबंधित आकडेवारी जमा करण्यात आली आहे. अनुदान सुरू राहील याकडेही समिती लक्ष देईल.

तीन राज्यात काँग्रेसकडून आश्वासनपूर्ती, केंद्रातही करू
> आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले. केंद्रातही पूर्ण करू. पंतप्रधान श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकतात, तर आम्ही गरिबांचे का नाही करू शकत ? - राहुल गांधी

> पंतप्रधान श्रीमंतांचे कर्ज माफ करू शकतात, तर आम्ही गरिबांना पैसे का नाही देऊ शकत : राहुल

गरिबांसाठी घोषणा देणे, साधन न देणे हा तर काँग्रेसचा इतिहास
गरिबांच्या नावाने राजकीय व्यवसाय आणि कपट हा तर काँग्रेसचा इतिहास आहे. गरिबी हटावसाठी ठोस धोरण काँग्रेस आखू शकलेली नाही. - अरुण जेटली

एक्सपर्ट व्हूय : राधिका पांडेय (अर्थतज्ज्ञ) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी

तार्किकदृष्ट्या हे शक्य, परंतु ३.६ लाख कोटी कोठून आणणार हे स्पष्ट नाही

ही चांगली योजना आहे. ही योजना गरिबांना किमान उत्पन्न हमीचे टॉप अप देते. तार्किकदृष्ट्या हे शक्य आहे. कारण ही कर्जमाफीपेक्षा उत्तम आहे. यात २ अडचणी आहेत.


> पहिली : गरिबांच्या उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध नाही, गरीब कोण हे कसे ठरवणार?
ग्रामीण आणि शहरी भागात हे कसे ठरवणार की, कोणाचे उत्पन्न किती आहे?
> दुसरी : ५ कोटी कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये दिले तर ३.६ कोटी रु. लागतील. इतके पैसे आणणार कोठून ? अनुदान बंद केले नाही तर सरकारचा तोटा वाढेल.

पुढील स्लाइडवर वाचा...काँग्रेसच्या चालीची कारणे आणि उद्देश

X