आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahul Gets A Chance In Test Cricket In The Role Of Opener Instead Of Rohit Sharma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राेेहितच्या जागी सलामीवीराच्या भूमिकेत राहुलला कसाेटीत संधी!

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दुखापतीमुळे राेहित शर्मा वनडे आणि कसाेटी मालिकेतून बाहेर
  • वनडे संघात मयंकला संधीची शक्यता; सलामी सामना उद्या रंगणार

नवी दिल्ली/दुबई - दाैऱ्यातील  पहिल्या टी-२० मधील मालिका विजयाच्या विराट यशाने आता भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात आहे. या पहिल्या विक्रमी विजयाने आत्मविश्वास दुुणावलेला भारतीय संघ आता यजमान न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिकाही आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, यापूर्वीच टीमला धक्का देणारी घटना घडली. पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात खेळताना झालेल्या दुखापतीमुळे आता राेहित शर्माला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्याला आता आगामी वनडे आणि कसाेटी मालिकेतून बाहेर पडावे लागले. उद्या बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. आता या मालिकेसाठी राेहित शर्माच्या जागी दाेन युवांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये कसाेटीसाठी सलामीवीरच्या भूमिकेत आता फाॅर्मात असलेल्या लाेकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याची नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील कामगिरी अधिक लक्षवेधी ठरली. त्याने तीन अर्धशतकांसह मालिकेमध्ये २२४ धावा काढल्या आहेत. ही त्याची या मालिकेतील सर्वाेत्तम खेळी ठरली. याशिवाय शुभमन गिलचीही निवड हाेण्याची शक्यता वर्तवली जाते. गिलने नुकत्याच झालेल्या यजमान न्यूझीलंड अ संघाविरुद्ध अनधिकृत कसाेटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने या कसाेटीत नाबाद द्विशतक ठाेकून सामना ड्रॉ केला.   तसेच वनडे संघात राेहितच्या जागी मयंक अग्रवालला संधी दिली जाईल. शेवटच्या सात कसाेटींच्या १२ डावांत राहुल अपयशी


लाेकेश राहुलने २०१९ पासून वनडे आणि टी-२० मध्ये शानदार कामगिरीची नाेंद केली. मात्र, कसाेटी सामन्यामध्ये त्याला अद्याप समाधानकारक अशी माेठी खेळी करता आली नाही. त्याने शेवटची कसाेटी आॅगस्ट २०१९ मध्ये विंडीजविरुद्ध खेळली हाेती. राहुलला करिअरमधील शेवटच्या सात कसाेटीच्या १२ डावांत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ताे यादरम्यान एकही अर्धशतक साजरे करू शकला नाही. राहुलने करिअरमधील ३६ कसाेटी सामन्यांच्या ६० डावात आतापर्यंत ३५ च्या सरासरीने २००६ धावा पूर्ण करता आल्या. यामध्ये पाच शतकांसह ११ अर्धशतकांचा समावेश आहे.क्रमवारी : राहुल करिअरमध्ये सर्वाेत्तम दुसऱ्या स्थानावर दाखल


लोकेश राहुलने मालिकेतील सर्वाधिक धावांच्या बळावर मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. यामुळेच त्याला मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवता आले. याचा त्याला टी-२० च्या क्रमवारीत चार स्थानांचा माेठा फायदा झाला. त्याने करिअरमधील सर्वाेत्तम दुसरे स्थान पटकावले. अशा प्रकारे तिन्ही फाॅरमॅटच्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंना टाॅप- २ मध्ये आपले स्थान निश्चित करता आले आहे.