Home | National | Delhi | Rahul has to give answer for The statement made by Raphael

राफेलवर कोर्टाच्या हवाल्याने केलेले वक्तव्य महागात

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 16, 2019, 08:07 AM IST

राहुल गांधी यांनी म्हटले होते-कोर्टानेही मानले चौकीदार चोर

 • Rahul has to give answer for The statement made by Raphael

  नवी दिल्ली- चौकीदार चोर आहे या मोहिमेत कोर्टाच्या नावाचा वापर केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना अवमान नोटीस जारी करत आठवड्यात स्पष्टीकरण मागितले आहे. राफेलप्रकरणी राहुल यांनी म्हटले होते की, ‘चौकीदार चोर आहे हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आहे.’ त्यावर भाजप खासदार मीनाक्षी लेखींनी अवमान याचिका दाखल केली होती. सुनावणीत सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही फक्त काही कागदपत्रांवर विचाराच्या कायदेशीर मुद्द्यावर निकाल दिला होता, त्यात पंतप्रधानांचा उल्लेख नव्हता.

  आयोगाने मोदींचा बायोपिक पाहावा, नंतर बंदीचा निर्णय घ्या

  सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक पूर्ण पाहावा आणि १९ एप्रिलपर्यंत बंदीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी २२ एप्रिलला होईल.


  पक्षांना आरटीआय कक्षेत आणा, मागणीवर मागवले उत्तर

  सुप्रीम कोर्टाने सरकार आणि निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना आरटीआयच्या कक्षेत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.

Trending