आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Rahul, Priyanka Mislead The Crowd And Then The Things Goes Wrong': Amit Shah From Delhi

'राहुल आणि प्रियंकांनी दिशाभूल करून दंगली भडकावल्या' : अमित शहांचा दिल्लीतून हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अलीकडेच पंतप्रधानांनी नवा नागरिकत्व कायदा(सीएए)आणला आहे. कॅबिनेटने त्यास मंजुरी दिली आणि लोकसभेने त्यास पारित केले. परंतु काँग्रेस नेते राहुल व प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दिल्लीत दंगली भडकावण्याचे काम केले, असा घणाघात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी घोषणा करू शकते. त्या आधी राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. रविवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तालकटोरा मैदानात पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित केले. तेव्हा ते बोलत होते. शहा पुढे म्हणाले, मला दिल्लीतील जनतेला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्हाला दिल्लीत दंगली भडकवणारे सरकार आणायचे आहे का? १९८४ मध्ये शीख नरसंहार झाला. अनेक शीख बंधू-भगिनींची हत्या झाली. काँग्रेसच्या एकाही सरकारने त्यांच्या जखमांवर कधीही मलम लावण्याचे काम केले नाही. मोदी सरकारने पीडितांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. त्याशिवाय दोषींना जेरबंदही केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पाच वर्षांत दिल्लीतील जनतेची फसवणूक करण्याचे काम केले. त्यांच्याकडून हिशेब घेतला जाईल.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या मुद्यावर शहा म्हणाले, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होत नाहीत, असा दावा विरोधी पक्षाकडून केला जातो. नानकाना साहिब सारख्या पवित्र ठिकाणी हल्ला करून शीख बांधवांत घबराट निर्माण करण्याचे काम पाकिस्तानने केले. काँग्रेस सोबतच आम आदमी पार्टीनेही कायद्यास विरोध केला. मोदी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानहून आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचे काम करत आहेत. परंतु त्याला केजरीवाल व राहुल गांधी सातत्याने विरोध करत आहेत.

जाहीर सभांतून प्रचार टाळणार

काँग्रेसने राम जन्मभूमीच्या प्रकरणात अनेक वर्षांपासून अडकलेल्या प्रकरणांची कोंडी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता राम जन्मभूमीवर मंदिर बनवण्याचा निवाडा केला. ही देशातील कोट्यवधी लोकांची इच्छा होती. परंतु काँग्रेस न्यायालयात त्यास विरोध करत होती.

वसाहतींना अधिकृत करणार

मोदींनी अनधिकृत वसाहतींना अधिकृत करण्याचे काम सुरू केले आहे. भाजपला निवडणूक सभा गाजवून लढायची नाही. आम्ही मोहल्ला मीटिंग करणार आहोत. त्याची सुरुवात मी केली आहे.

या वेळी दिल्ली भाजपचे सरकार सत्तेवर येईल. इतर पक्षांसाठी निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याचे साधन असू शकते. भाजपचा लोकशाहीवर विश्वास आहे. परंतु आम्ही निवडणूक आमच्यासाठी लोकशाहीतील उत्सव आहे. दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यात येतील, असे आश्वासन आम्ही दिले होते. त्यानुसार मोदींनी अनधिकृत वसाहतींना अधिकृत करण्यास सुरुवात केली आहे.