आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नऊ वर्षांपूर्वी तनवीर अहमदच्या चित्रपटात दिसलेला राहुल रॉय पुढच्या वर्षी लागोपाठ चित्रपट करणार आहे. "सयोनी' चित्रपटात तो रशियात स्थायिक झालेल्या भारतीय माणसाची भूमिका साकारणार आहे. ९० च्यादशकात सुपरहिट 'आशिकी' चित्रटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणारा राहुल रॉय पुन्हा परतला आहे. त्याचा एकच चित्रपट हिट ठरला होता. नंतर त्याला भट्ट बंधुनी सहा चित्रपटात घेतले होते. त्याने अनेक निर्मात्यासोबत काम केले मात्र ते 'आशिकी' सारखे सुपरहिट ठरले नाही. त्यानंतर तो नऊ वर्षांपूर्वी तनवीर अहमदच्या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. आता तोपरतला असून लागोपाठ सहा चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या चित्रपटाचे नाव 'सयोनी', 'रहबार', 'ए थिन लाइन', 'नाइट अँड फॉग', 'डेथ ऑफ एन अॅम्बेसडर' आणि 'गायत्री' आहे. यापैकी एकही मोठ्या बॅनरचा नाही. यातील काहींचे श्ूटिंग पूर्ण झाले आहेत तर काही पुढच्या वर्षी रिलीज होतील. राहुल इतक्या चित्रपटातून पुनरागमन करत असल्यामुळे खुश आहे. तो म्हणतो..., खरं सांगायचं झाले तर मी परत आलो आहे. अडचणीमुळे मी ऑस्ट्रेलियाला गेलो, तेव्हा तीन-तीन महिन्यासाठी भारतात येत होतो. मात्र इंडस्ट्रीचे नियम बदलले, तुम्ही जर मुंबईत असाल तरचं काम मिळते नाही तर मिळत नाही. शिवाय त्या काळात माझा कौटंुबिक वादही सुरू होता. २०१५ मध्ये माझा घटस्फोट झाला आणि मी मुंबईला परतो.
आगामी 'सयोनी' चित्रपटाविषयी राहुल सांगतो...
यात मी मूळ भारतीय रशियन बनलो आहे. तो मास्कोमध्ये राहतो. त्याचे काहीच नैतिक मूल्ये नसतात. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक रशियाचे आहेत. ८५ टक्के श्ूटिंग रशियात पूर्ण झाले १५ टक्के पंजाबमध्ये झाले. यात प्रसिद्ध गाणे सयोनीचे रिक्रिएशन करण्यात आले आहे. याचे लेखन अलौकिकने केले आहे. अरिजीत सिंहने गायले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.