आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात हजेरी लावणार सोनिया आणि राहुल गांधी, ममतांचा येण्यास नकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आजाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात सामील होणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील याठीकाणी हजेरी लावू शकतात. 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

 

तेलंगानाते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावदेखील या कार्यक्रमात येणार आहेत. त्यांच्याशिवाय वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी येतील, पण आधी ते गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात माजी पंतप्रधान, सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण आहे.


ममता म्हणाल्या- माफ करा मोदीजी...! शपथविधीला मी नाही येऊ शकत

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला येणास नकार दिला आहे. आधी त्यांनी या कार्यक्रमात येण्यास होकार दर्शवला होता, पण नंतर त्या म्हणाल्या की, रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, बंगालच्या हिंसाचारात 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. भाजपचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे ममता म्हणाल्या- "मोदीजी मला माफ करा, मी शपथविधीला येऊ शकत नाही." दुसरकीकडे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयनदेखील या सोहळ्याला येणार नाहीयेत.

बातम्या आणखी आहेत...