आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul's Taunt On BJP, Cases Filed Against Me Like Medals, Ideological Battle With BJP

भाजपने देशभरात माझ्याविरुद्ध खटले दाखल केले, माझ्यासाठी ती खूप गौरवाची बाब आहे, राहुल गांधींचा भाजपला टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी केरळच्या वायनाड आणि कोझिकोडमध्ये सभा घेतल्या

वायनाड(केरळ)- काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज(गुरुवार) त्यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यांवरून भाजपवर निशाना साधला. ते म्हणाले की, "भाजपने माझ्याविरुद्ध देशभरात 15-16 तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीमुळे मी मागे फिरणार नाही. सैनिक जसे आपल्या छातीवर शौर्याची पदके मिरवतात, तसेच या तक्रारी माझ्यासाठी पदकांप्रमाणे आहेत. माझ्यासाठी ही गौरवाची बाब आहे." राहुल गांधीनी वायनाड आणि कोझिकोडमध्ये सभा घेतल्या. काँग्रेसच्या नेतृत्वात यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ)च्या सम्मेलनात त्यांनी भाजपवर निशाना साधला. ते म्हणाले की, भाजपसोबत विचारधारेची लढाई आहे.

'मोदी आणि शाह कल्पनेच्या दुनियेत असतात'
 
यापूर्वी कोझिकोडमध्ये राहुल यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले की, दोन्ही नेत आपल्याच कल्पनेच्या दुनियेत असतात. त्यांना इतरांशी काहीच घेण-देण नाहीये. यामुळेच देश अडचणीत सापडला आहे.

'नागरिकत्व विधेयकाला विरोध करणार'
 
पुढे ते म्हणाले की, "काँग्रेस पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तानवरुन येणाऱ्या बिगर मुस्लिम शरणार्थ्यांना नागरिकत्व देण्याच्या विधेयकाचा विरोध करणार. आम्ही देशातील कोणत्याच धर्मासोबत भेदभाव होऊ देणार नाहीत."

बातम्या आणखी आहेत...