आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री संजय देशमुख यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाचा छापा, कारण गुलदस्त्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस - माजी क्रीडा राज्यमंत्री व भाजप नेते संजय देशमुख यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. संबंधित विभागाचे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी अशा जवळपास वीस जणांचा यामध्ये समावेश आहे. हा छापा नेमका कोणत्या प्रकरणात किंवा कशासाठी टाकण्यात आला आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. 


जोपर्यंत पथकाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. पण या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय देशमुख हे काँग्रेस सरकारमध्ये असताना क्रीडा राज्यमंत्री होती. काँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपमध्येच आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...