Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Raid in city; 21 people arrested in case of gambling

शहरात जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना मुद्देमालासह अटक

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 11:13 AM IST

रेल्वे पुलाजवळील प्रियंका कॉलनी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला

  • Raid in city; 21 people arrested in case of gambling

    नगर- नगर- पुणे महामार्गावरील रेल्वे पुलाजवळील प्रियंका कॉलनी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत तब्बल २१ जणांना अटक करून दोन लाख ५७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नगर शहरात जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


    शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राजरोसपणे हा जुगार सुरू आहे. मात्र, नूतन पोलिस अधिकारी मिटके यांनी पदभार घेताच शहरातील जुगार अड्यांकडे आपला मोर्चा वळवला. नगर- पुणे महागार्गावरील रेल्वे पुलाच्या खाली प्रियंका कॉलनी परिसरात मागील काही दिवसांपासून राजरोसपणे जुगार अड्डा सुरू होता. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिटके यांच्या पथकाने गुरुवारी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. आरोपी जावेद इब्राहिम शेख व फिरोजखान सुलेमान खान हे दोघे हा जुगार अड्डा चालवत होते. छापा टाकताच जुगाऱ्यांची पळापळ झाली. पोलिसांनी २१ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन लाख ५७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मधुकर नाथजी मोहिते (कल्याण रोड), वैभव विलास पाचरणे (वैष्णवनगर, केडगाव), मोसिन अफजल पठाण (एकनाथनगर, केडगाव), जलील ताजुद्दिन पठाण (आशा टॉकीज परिसर), अनिल बाबासाहेब भागवत (कुंभारगल्ली, नालेगाव), शेख रज्जाक अब्दुल सौदागर (तख्ती दरवाजा, कोतवाली), अजिंक्य रमेश म्हस्के (रामचंद्र खुंट), सुधाकर सर्जेराव डांगळे (झेंडीगेट), संजू अंबादास कुलकर्णी (सावेडी गावठाण), संदीप बबन सावंत (आगरकर मळा), विजय चांदमल मुनोत (विनायकनगर), जयेश चंद्रशेखर मिस्त्री (मल्हार चौक), विकास विलास करपे (पंचपीर चौक, माळीवाडा), सचिन संजय राऊत (बुरूडगाव रोड, राऊत मळा), फिरोजखान सुलेमान खान (आशा टॉकीज चौक), शेख मोहसीन इसामोद्दिन, भाऊसाहेब दत्तात्रय सेंदर (सर्जेपुरा), शाकीर सिकंदर शेख (आशा टॉकीज चौक), पंडित सुखदेव खुडे (स्टेशन रोड, कायनेटिक चौक), सुरेश शिवदास नन्नवरे (कायनेटिक चौक), जावेद इब्राहिम शेख (गांधी मैदान) अशी आरोपींची नावे अाहेत. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस नाईक हेमंत खंडागळे, महेश मगर, सचिन जाधव, अभिजित अरकळ, सुजित सरोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस कर्मचारी अभिजित अरकळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.


    सर्वच जुगार अड्ड्यांवर हवी कारवाई
    तत्कालिन सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी शहर व परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकले होते. स्थानिक पोलिसांनी मात्र या जुगार अड्डयांकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता नूतन पोलिस उपअधीक्षक मिटके यांनी पदभार घेताच जुगार अड्ड्यांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शहरात अनेक ठिकाणी लहान- मोठे जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. मिटके यांनी या जुगार अड्ड्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी समोर येत आहे.

Trending