आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार तसेच चक्री जुगार खेळणाऱ्यांच्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; 21 हजारांचा माल जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- मुंबई व कल्याण मटक्याचा जुगार तसेच चक्री जुगार खेळणाऱ्यांच्या अड्ड्यांवर विविध ठिकाणी छापे मारून चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून जुगाऱ्यांकडून २१ हजार रुपयांच्या मालाची जप्ती केली. 

 

येरमाळा बसस्थानकाशेजारी कल्याण मटका खेळणारे सुरज भरत मोरे याला येरमाळा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १३४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाशी येथील पारा चौकात कल्याण मटका खेळणाऱ्या रामहरी लक्ष्मण जाधव, निवांत सर्जेराव कवडे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एका मोबाइल सह ७७२० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. परंडा येथील चक्री जुगाराच्या अड्ड्यावर परंडा पोलिसांनी छापा मारला. तेव्हा नवाज हसन पठाण याला पकडण्यात आले. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाइल ११ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...