आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात चंदन ऑइल फॅक्टरीवर छापा; तीन लाखांचे चंदन पावडर जप्त

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्याच्या दत्तपूर शिवारातील चंदन चोरीचे थेट कनेक्शन आता मध्य प्रेदशात असल्याचे उघड झाले. अंबाजोगाई वन विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चंदन ऑईलच्या फॅक्टरीवर छापा मारून तीन लाखांचे चंदन पावडर हस्तगत केले. या प्रकरणात पकडलेल्या ६ आरोपींना सोमवारी सकाळी प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  मुख्य सूत्रधारासह तिघे फरार आहेत.

दत्तपूर परिसरात चंदन चोरीचा प्रकार घडल्यानंतर वन विभागाने २६ फेब्रुवारी रोजी सिताराम गणेश कसबे, शिवराम दत्तात्रय सुरवसे, सुनरल कोंडीराम साळवे, दिगंबर आबा गायकवाड, गजानन भास्कर लांडगे रा. तांदुळजा ता. जि. लातूर या पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलहस कोठडी दिली होती. या आरोपींच्या चौकशीत अमर बलभीम हुलगुंडे याला अटक करण्यात आली. या सहा जणांची तपासणी केली असता या टोळीचा मुख्य सूत्रधार हनुमंत घुगे रा.होळ,  असल्याचे समजले.  अमर  नरसिंगे व अनिल पाटोळे रा.तांदुळजा यांचीही नावे  तपासात पुढे आली. हे तिघेही फरार आहेत.  आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वन विभागाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील एन. टी. इसेन्शिअल ऑईल पथकाने बऱ्हाणपूर येथील या ऑईल कंपनीवर  मध्ये प्रदेश वन विभागाच्या सहाय्याने छापा टाकला. या कपंनीत ३ लाख रुपये किमतीची १४७ किलो  चंदन पावडर  हस्तगत करण्यात आली.  फरार  आरोपींचा शोध  सुरू आहे. सोमवारी  पकडलेल्या सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी असता या सहा जणांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बातम्या आणखी आहेत...