Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Raid on gambling spot in Mohal, crime against 27 people

मोहोळला जुगार अड्ड्यावर छापा, नगराध्यक्षासह २७ जणांवर गुन्हा

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 10:59 AM IST

मोहोळ येथील मेहबूबनगर परिसरात जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. जुगारासाठी जागा

 • Raid on gambling spot in Mohal, crime against 27 people

  मोहोळ- मोहोळ येथील मेहबूबनगर परिसरात जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. जुगारासाठी जागा दिल्याने नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह २७ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


  या कारवाईत संशयितांकडून बारा मोटारसायकली, २९ मोबाइल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख २४ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.


  याबाबत मोहोळ पोलिसांनी सांगितले की

  शहराच्या मध्यवस्तीत मेहबूबनगर परिसरात नगराध्यक्ष बारसकर यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली. त्यानंतर छापा टाकण्यात आला. अरुण सदाशिव शिंदे (अनगर), शिवशंकर सदाशिव चव्हाण (कुरणवाडी), प्रेमानंद महादेव मोहरे (वाणी गल्ली), योगेश प्रकाश जाधव (कुरुल), मोहम्मद इब्राहिम बागवान (सोमराय नगर), शशिकांत प्रभू सनगर (गवत्या मारुती चौक), संतोष किसन सदरे (देशमुख गल्ली), बालाजी ज्ञानेश्वर जाधव (कुरुल), उमेश दत्तू पारवे (सय्यद वरवडे),नाना लक्ष्मण जाधव (यावली), युवराज अशोक कापुरे (कोळेगाव), बाळासाहेब विठ्ठल गायकवाड (चौमुखी मारुती गल्ली), यांच्यासह 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


  सत्यवान जनार्दन कादे (आदर्श चौक), फकरुद्दीन सरदार मुजावर (दत्तनगर), सुभाष शिवलिंगप्पा (कडगंची गुलबर्गा), रवींद्र नागनाथ विभूते (भुसार पेट), हसन कम्रूद्दिन तलफदार (मेहबूब नगर), इरफान गुलाब बागवान (बागवान चौक), अचित बब्रुवान गायकवाड (गायकवाड वस्ती), अजय तानाजी देशमुख, विद्यानगर, मरगु अंबादास धोत्रे (वडर गल्ली), सुमित तुकाराम पवार (नागनाथ गल्ली), संतोष मारुती धोत्रे (वडर गल्ली), अमोल नरसिंह कुर्डे, शरफोद्दीन अफजल तव्वकल (सिद्धार्थनगर), मोहन महादेव चोरमले (दत्तनगर) आदी २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


  पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट, हेडकॉन्स्टेबल प्रवीण बिराजदार, तांडुरे, मुल्ला, सय्यद, भोई, थोरात, थिटे, जाधवर, घुले यांच्या पथकाने कारवाई केली.

Trending