आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा सेंटरमध्ये 7 वर्षांपासून सुरू होते 'भलतेच' काम, 2-2 हजार रुपयांत सुरू होता सौदा, पोलिसांनी रेड टाकताच समोर आले सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम - एमजी रोड येथील सहारा मॉलमध्ये 7 वर्षांपासून सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी पूर्वोत्तर राज्यांतील 5 तरुणींसहित 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 1 मॅनेजर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.


मॉलमध्ये सुरू होता देहव्यापार
- मेट्रो पोलिस स्टेशनच्या महिला निरीक्षक पूनम हुड्डा म्हणाल्या की, गुप्त माहिती मिळाली होती की, सहारा मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर अलाइव्ह केअर नावाने दोन स्पा सेंटर मागच्या 7 वर्षांपासून सुरू आहेत. यात स्पाच्या नावावर देहव्यापार सुरू होता.

 

- त्या म्हणाल्या की, यावर टीम बनवून सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दोन बनावट ग्राहक दोन्ही सेंटरवर पाठवण्यात आले. त्यांच्याशी 2-2 हजारांत सौदा ठरला.

 

- त्यांनी सांगितले की, सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहकांनी पोलिस पथकाला इशारा केला, ज्यावर टीमने घटनास्थळी पोहोचून स्पा सेंटरमध्ये उपस्थित सर्वांना पकडले. चौकशीनंतर स्पा सेंटरचा मॅनेजर जसवंत यालाही ताब्यात घेण्यात आले.

 

- देह व्यापारात सहभागी महिला पूर्वोत्तरमधील सिलीगुडीच्या आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्याही महिला यात सहभागी होत्या. त्यांच्याविरुद्ध सेक्टर-29 पोलिसांनी गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...