आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांपासून फरार अतिरेक्याच्या तीन घरांवर छापे: 2008 मध्ये बनावट पासपोर्टवर फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर -  दहशतवादी कारवायांसाठी होत असलेल्या अर्थपुरवठ्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थे(एनआयए)ने मंगळवारी येथील लाल बाजार भागात ३ घरांवर छापे टाकले. ही घरे १० वर्षांपासून फरार व्यावसायिक व हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी नासिर सैफी मीरच्या कुटुंबाची आहेत.  


एनआयएनुसार, ४८ वर्षीय मीरवर हुरियत नेत्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे. जामीन मिळाल्यानंतर ऑक्टोबर २००८ मध्ये तो बनावट पासपोर्टवर नेपाळमार्गे युरोपला पळाला होता. दहा वर्षे जुन्या प्रकरणात एनआयएने १० महिन्यांपूर्वी प्रथमच पुन्हा एफआयआर दाखल केला. मीरने पासपोर्ट कसा तयार केला याचा शोध एनआयए घेत आहे. काश्मीरमध्ये  मीर कार्पेटच्या व्यवसायाआडून हवालामार्गे फुटीरतावाद्यांना पैसे पुरवत होता. दिल्ली पोलिसांनी ३ फेब्रुवारी २००६ रोजी त्याची लाजपतनगर येथे अटक केली होती. त्याच्याकडून ५५ लाख रुपये व स्फोटके जप्त केली हाेती. सुनावणीदरम्यान त्याने आईच्या आजारपणाचे कारण देत जामीन मिळवला व बेपत्ता झाला. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, युरोप व लिबियामार्गे तो २०११ मध्ये दुबईला पोहोचला होता.

 

काश्मिरी नागरिकांवर हिंसाचाराचा आरोप ठेवत निंदाव्यंजक प्रस्ताव मंजूूर  
इस्लामाबाद । भारतीय सुरक्षा दल काश्मिरी नागरिकांवर हिंसाचार करत असल्याचा आराेप ठेवत पाकिस्तानच्या संसदेने सोमवारी निंदाव्यंजक ठराव मंजूर केला. काश्मीर तसेच गिलगिट-बाल्टिस्तानशी संबंधित खात्याचे मंत्री अली अमीन यांनी संसदेत हा प्रस्ताव सादर केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मीर वाद सुटला पाहिजे,अशी मागणी सभागृहाने केली.

बातम्या आणखी आहेत...