National / 'रायगडला परत एकदा राजधानीचा दर्जा द्या', लोकसभेत खासदार डॉ. अमोल कोल्हेंची मागणी


कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नेहमी पुढे असतात

दिव्य मराठी वेब

Jun 24,2019 07:43:00 PM IST

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आज आपले म्हणणे मांडले. अमोल कोल्हेंनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारी पहिली मागणी लोकसभेत केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या, असे अमोल कोल्हे म्हणाले.


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, "17 व्या शतकात जसे रायगड राजधानी होती, तशीच ती पूर्ववत करावी. स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे ती जपायला हवी."

कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नेहमी पुढे असतात. त्यांनी टीव्ही मालिका किंवा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे आणि आताही ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. छत्रपती संभाजी महाराज या मालिकेने तर अमोल कोल्हे यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले.


शिरुरमध्ये मतदारसंघातून विजयी
लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून लढलेल्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे मोठे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार निवडून आले आहेत. त्यामध्ये अमोल कोल्हें आहे.

X
COMMENT