Fire / रायगड : उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये भीषण आग; अग्निशमनच्या 2 जवानांसह 5 जणांचा मृत्यू , 3 गंभीर जखमी

आग विझवण्यासाठी जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Sep 03,2019 12:56:12 PM IST

रायगड - जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्लँटमध्ये आज सकाळी सात वाजता मोठी आग लागली. या आगीमध्ये अग्निशमन दलातील 2 जवानांसह 5 जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 25 जणांना आगीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे.

नवी मुंबईचे पोलिस कमिश्नर संजय कुमार यांनी सांगितले की, वॉटर ड्रेनेज सिस्टममधून ही आग भडकली असून तिचे तिसरी लेव्हले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्लँटमध्ये अजूनही अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्गिशमन दलाच्या गाड्या दाखल आहेत. तर ओएनजीसीने ट्वीट करून प्लँटमधून गॅसचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. आगीचे रौद्ररुप पाहता आसपासचा परिसर खाली करण्यात आला आहे.

X