आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rail Hostess Salaries Are Half That Of Compared To Air Hostess, The Work, However, More Than Doubled

एअर होस्टेसच्या तुलनेत रेल्वे होस्टेसचे वेतन अर्धेच, काम मात्र दुपटीपेक्षा जास्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पांडेय

नवी दिल्ली - आता एअर होस्टेसच्या धर्तीवर रेल्वेत ट्रेन होस्टेसची सुरुवात करण्यात आली आहे. पण ट्रेन होस्टेसचे वेतन एअर होस्टेसच्या तुलनेत अर्धेच आहे. एवढेच नाही तर त्यांचे ड्यूटी अवर्सही एअर होस्टेसच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त आहेत. एअरलाइन्समध्ये त्यांचे वेतन सर्व प्रकारचे भत्ते मिळून ५० हजार (एअर इंडियाची देशांतर्गत उड्डाणे) आहे, तर ट्रेन होस्टेसचे वेतन २५ हजार रुपये आहे. एअरलाइन्समध्ये डीजीसीएच्या नियमानुसार ९ तासांची ड्यूटी असते आणि ती दरमहा ९० तास असते, तर वंदे भारत आणि तेजसमध्ये दरमहा १३ दिवस ड्यूटी करावी लागते; ती १७-१७ तासांची असते. एअरलाइन्समध्ये कंपन्या स्वत: नियुक्ती करतात, प्रशिक्षण देतात.
 

एअर होस्टेस
> १२ वी पास, हिंदी आणि इंग्रजी बोलणे. सामान्यत: उंची १६० सेेंमी आवश्यक.
> १८ ते ३० वर्षे. ४० नंतर ग्राउंडचे काम देतात.
> जाहिरातीनंतर आलेल्या अर्जांची छाननी होते. नंतर मेडिकल. नंतर उर्वरित अर्जदारांची चाचणी घेतली जाते. 
> ३ महिन्यांचे ट्रेनिंग. साडी नेसणे, ड्रायव्हिंगही शिकवतात.
> सर्व प्रकारचे भत्ते मिळून दरमहा वेतन ५० हजार रु. 
> छेडछाड किंवा इतर घटना झाल्यास, जेथे फ्लाइट लँड होते, त्या विमानतळावर पोलिसांकडे तक्रार करावी लागते.
 

रेल्वे होस्टेस
> १२ वी पास, हिंदी व इंग्रजी बोलणे, एक वर्षाचा डिप्लोमा, एक महिन्याचा विशेष कोर्स.
> सध्या वयाचे काही बंधन नाही. ६ महिन्यांचे प्रोबेशन.
> आयआरसीटीसीने वंदे भारतमध्येे अकॅडमीमार्फत भरती केली आहे, तर खासगी ट्रेनमध्ये आऊटसोर्स केले आहे.
> आयआरसीटीसीने वंदे भारतमध्येे अकॅडमीमार्फत भरती केली आहे, तर खासगी ट्रेनमध्ये आऊटसोर्स केले आहे.
> अकॅडमीतच ट्रेनिंग. रेल्वेसाठी विशेष ट्रेनिंग मिळाले.
> सध्या त्यांचे सुरुवातीचे वेतन दरमहा २५ हजार रु. आहे.
> ज्या स्थानकांत रेल्वे थांबली तेथे जीआरपीच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार करावी लागते.

बातम्या आणखी आहेत...