Home | Maharashtra | Mumbai | Rail traffic on the Western Railway route disrupted due to fire cause

डहाणू आणि वाणगाव रेल्वे स्टेशनदरम्यान मालगाडीच्या डब्ब्यांना आग, पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 06:00 PM IST

मुंबई-गुजरातदरम्यानची वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली असून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहे.

  • Rail traffic on the Western Railway route disrupted due to fire cause

    पालघर- डहाणू आणि वाणगाव रेल्वे स्टेशनदरम्यान मालगाडीच्या दोन डब्ब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे मुंबई-गुजरातदरम्यानची वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली असून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहे.

    > गुरूवारी रात्री 11 वाजेच्या आसपास कौनंराज नावाच्या मालगाडीला आग लागली. ही गाडी सुरतकडून जेएनपीटीला जात असताना वाणगाव- डहाणू रेल्वे स्टेशनदरम्यान या गाडीच्या दोन डब्ब्यांना अचानकपणे आग लागली. ओव्हरहेड वायर तुटल्याने ऑईल असलेल्या डब्ब्यांना आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या आगीमुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने काही काळ धिम्या गतीने रेल्वेगाड्यांची वाहतूक चालू होती.

    > घटनास्थळी रेल्वे अधिकारी, टेक्निकल टीम आणि कर्मचारी हे दाखल होत त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. ही मालगाडी असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Trending