Railway Budget / रेल्वे वेगात...अर्थसंकल्पातील तरतुदींची आकडेवारी रेल्वेने केली जाहीर; नगर-बीड-परळी मार्गासाठी ५५०, लातूर काेच फॅक्टरीला २०० काेटी

साेलापूर- उस्मानाबाद- तुळजापूर या मार्गासाठीही ५ काेटींची तरतूद 

दिव्य मराठी

Jul 11,2019 08:34:00 AM IST

औरंगाबाद - माेदी सरकारने नुकत्याच सादर केेलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी जाहीर केलेल्या निधीची आकडेवारी रेल्वे विभागातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यात राज्यातील महत्त्वपूर्ण अशा अहमदनगर- बीड- परळी या निर्माणाधीन मार्गासाठी ५५० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. तर लातूर येथे उभारण्यात येणाऱ्या काेच फॅक्टरीसाठी तब्बल २०० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. साेलापूर- उस्मानाबाद- तुळजापूर या मार्गासाठीही ५ काेटींची तरतूद करण्यात आली आहे. नगर- बीड- परळी या अनेक वर्षांपासून रखडत पडलेल्या २५० किलाेमीटरच्या रेल्वे मार्गाला माेदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१४ पासून चालना देण्यात आली. या कामाने दाेन्ही बाजूंनी वेग घेतला असून आता मिळालेल्या भरीव निधीमुळे २०२० पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण हाेण्याची आशा निर्माण झाली आहे.


३४ काेटी रुपये मुदखेड- परभणी दुहेरीकरणासाठी
दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या मुदखेड- परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी ३४.५० काेटींची तरतूद केली आहे. परळी- परभणी रेल्वे रूळ नूतनीकरणासाठी ६ काेटी, मनमाड- मुदखेड रूळ नूतनीकरण ६ काेटी दिले जाणार आहेत.


मेट्रो डब्यांची लातुरात निर्मिती
पुण्यात उभारण्यात येणाऱ्या मेट्राेचे डबे लातूर कारखान्यात तयार होतील. नाशिक राेड रेल्वे चाकांच्या दुरुस्ती कारखान्यासाठी ६ काेटींचा निधी या आर्थिक वर्षात मिळेल.


रेल्वेची ६ हजार कोटी बचत
नवी दिल्ली - रेल्वे ग्रीन टेक्नॉलॉजी वापरून ओव्हरहेड लाइनचे करंट कोचमध्ये वीज, एसीसाठी देईल. यामुळे ६ हजार कोटींची बचत होईल.


प्रस्तावित रेल्वे मार्ग - निधी तरतूद
> अमरावती- नरखेड : ९० लाख
> बारामती : लाेणंद : १ काेटी
> वर्धा- नांदेड व्हाया यवतमाळ : ३५० काेटी
> कराड- चिपळूण : १० लाख
> इंदूर- मनमाड- मालेगाव : १० लाख
> पुणे- नाशिक : १० लाख
> वैभववाडी- काेल्हापूर : १० लाख
> जेऊर- आष्टी : १० लाख
> फलटण- पंढरपूर : १० लाख
> हातकणंगले- इचलकरंजी : १० लाख
> साेलापूर - उस्मानाबाद- तुळजापूर : ५ काेटी
> धुळे- नरडाणा : १० लाख
> कल्याण- मुरबाड व्हाया उल्हासनगर : १० हजार
> पाचाेरा- जामनेर - मलकापूर : १ काेटी
> कल्याण- कसारा (तिसरी लाइन) - १६० काेटी
> भुसावळ- जळगाव (तिसरी लाइन) : ५० काेटी
> वर्धा- नागपूर (तिसरी लाइन) : ११० काेटी
> इटारसी - नागपूर : १८५ काेटी
> पुणे- मिरज- लाेंडा : ३८९.४९ काेटी
> दाैंड- मनमाड : ३७० काेटी
> वर्धा- नागपूर (चाैथी लाइन) : १३५ काेटी
> मनमाड- जळगाव (तिसरी लाइन) : ९० काेटी
> जळगाव- भुसावळ (चाैथी लाइन) : ५५.५१ काेटी
> इगतपुरी- मनमाड ( तिसरी लाइन) : १० काेटी

X