आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Railway Announces 78 Days Wages As Bonus For 11 Lakh Railway Staff, To Cost Government 2024 Crore

रेल्वेच्या 11 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर; सरकारी तिजोरीवर 2 हजार कोटींचा बोजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे विभागातील 11 लाख कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषमा करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर 2,024 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी
रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही सलग 6 वी वेळ आहे असेही यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीही सहभाग घेतला. यामध्ये बोलताना, सरकार ई-सिगारेटवर बंदी लावत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कॅबिनेटच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, ई-सिगारेटच्या उत्पादन, निर्यात, आयात आणि वितरणावर देखील बंदी लावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...