आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेचे मुंबईतच भाडे कमी, भारतभर जादा; आरटीआय कार्यकर्ते प्रा. एस. एस. जाधव यांचा आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मुंबई वगळता राज्याच्या इतर भागात रेल्वे विभाग प्रवाशांकडून तिकिटापोटी दामदुप्पट रक्कम वसूल करीत आहे. मुंबईतील प्रवाशांसाठी वेगळे भाडे आणि इतरत्र दामदुप्पट अशी दुजाभावाची वागणूक रेल्वे विभाग देत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते प्रा. एस. एस. जाधव यांनी केला. रेल्वेने प्रति किलोमीटर दरनिश्चिती केल्यानंतरही ही लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

संपूर्ण देशात रेल्वे वाहतुकीचे जाळे आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वेचे तिकीट दर लागू करण्यासाठी किमी अंतर व त्यासाठी आकारण्यात येणारे भाडे याचे धोरण निश्चित केले आहे. रेल्वेचे भाडे आकारण्यामध्ये मात्र प्रचंड तफावत असल्याचे जाधव यांनी मिळवलेल्या माहितीवरून आणि पुराव्यांवरून दिसून येत आहे. रेल्वेचे भाडे हे किमीमधील अंतर याद्वारे आकारले जाते. कोट्यवधीच्या संख्येतील प्रवासी पॅसेंजर गाडीने प्रवास करतात. ते भाडे किमी अंतरानुसार आकारले जाते. १ ते १५ किमी रेल्वे अंतरासाठी रेल्वेचे भाडे केवळ ५ रुपये आकारावयास हवे. त्याची अंमलबजावणी मुंबई लोकल ट्रेनमधील भाड्यासाठी होते. परंतु संपूर्ण राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी सर्रासपणे कमीत कमी भाडे ५ रुपयांच्या ऐवजी १० रुपये आकारले जात आहे. त्यासाठी प्रत्यक्ष तिकिटाचा पुरावा म्हणून मुंबई सीएसटी स्टेशन ते वडाळा रोड १० किमी अंतरासाठी ५, तर मुंबई सोडून द.म. रेल्वेच्या नांदेड विभागात नांदेड ते मुगट १२ किमी व नांदेड ते लिंबगाव १४ किमी अंतरासाठीसुद्धा रेल्वेचे भाडे चार्टनुसार ५ रुपये आकारणे आवश्यक असताना १० रुपये का आकारले जाते, असा प्रश्नही प्रा. जाधव यांनी उपस्थित केला. 

 

बातम्या आणखी आहेत...